शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

शिवपूर्वकालीन स्वयंभू पाचाडची सोमजाई देवी; जिजाऊ माँसाहेबांचे श्रद्धास्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:03 IST

हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्या पाचाड गावात जिजाऊ माँसाहेबांचा वाडा आणि त्यांची समाधी यामधील जागेत सोमजाई देवीचे मंदिर आहे.

- जयंत धुळपअलिबाग : हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्या पाचाड गावात जिजाऊ माँसाहेबांचा वाडा आणि त्यांची समाधी यामधील जागेत सोमजाई देवीचे मंदिर आहे. शिवपूर्वकाळापासून अस्तित्वात असलेली ही सोमजाई देवी जिजाऊ माँसाहेबांचे असीम श्रद्धास्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या अटीतटीच्या लढायांच्यावेळी यशप्राप्तीसाठी माँसाहेबांकडून सोमजाई देवीचा कौल घेतला जाई. सोमजाईने दिलेला कौल आणि नवस वास्तवात उतरल्याची अनेकांची अनुभूती आहे आणि म्हणूनच वर्तमानात पाचाडची ग्रामदेवता असणाऱ्या या सोमजाई देवीचे महत्त्व आणि माहात्म्य अनन्यसाधारण असेच मानले जाते.जिजाऊ माँसाहेब यांच्या समवेत त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी पुतळाबाई राजवाड्यात राहत असत. दररोज उभयता सोमजाईची पूजा करून देवीचे दर्शन घेत असत,अशी नोंद इतिहासात आहे. मौखिक परंपरेतून सोमजाई देवीच्या महत्त्व आणि महात्म्याच्या अनेक कथा शिवकालापासून चालत आल्या आहेत. स्वयंभू आणि जागृत अशा या सोमजाई देवीला परिसरातील गाई येऊन दुधाच्या धारा देऊन जात होत्या अशी मौखिक परंपरेतून आलेली कथा पाचाडचे माजी सरपंच आणि असीम शिवभक्त रघुवीर देशमुख यांनी सांगितली. सोमजाई देवीच्या मंदिरासमोर जिजाऊ माँसाहेबांनी त्याकाळी बाग तयार केली होती, ती ‘राणीची बाग’म्हणून ओळखली जाई. आजही प्राचीन शिवमंदिर आणि गणेश मंदिराचे पुरातन अवशेष आढळतात.जिजाऊ माँसाहेबांच्या काळात सोमजाई देवीच्या मंदिरामागे संपूर्ण पाचाड गाव वसलेले होते. घरांची जोती, घरांचे पुरातन अवशेष आजही त्या गावाची साक्ष देतात. सुमारे २०० वर्षांपूर्वी महामारी आली आणि गावात मोठा मृत्यूप्रकोप झाला. त्यानंतर सुमारे १५० वर्षांपूर्वी मोठे भूस्खलन झाले आणि संपूर्ण गाव गाडले गेले आणि दुसºयांदा गाव उठले आणि वर्तमानात असलेल्या जागी पाचाड गाव वसले.सोमजाई देवीचा सहाणेवरील आगळा ऐतिहासिक नवरात्रोत्सवसोमजाई देवीच्या समोर देवीचा ‘सहाण’ आहे. याच सहाणेवर देवीचा पारंपरिक नवरात्रोत्सव आणि होळीचा सण साजरा करण्याची ऐतिहासिक परंपरा आजही अबाधित आहे. सोमजाईचे प्राचीन मंदिर आणि मूर्ती काहीशी जीर्ण झाल्याने १० वर्षांपूर्वी २००८ मध्ये शिवभक्त देशमुख यांच्या पुढाकाराने आणि सर्व पाचाड ग्रामस्थ यांच्या सहयोगाने सोमजाई देवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. सोमजाई देवीचा आगळा नवरात्रोत्सव प्राचीन परंपरा अबाधित राखून आजही करण्यात येतो.

टॅग्स :Raigadरायगड