शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उरण परिसरात सापांची दहशत वाढली; आठवडाभरात विषारी सर्पदंशाच्या सहा घटना उघडकीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 20:55 IST

उरण परिसरातील जंगल, डोंगर -दऱ्या, दलदलीच्या जागा नष्ट झाल्या आहेत.परिणामी उरण परिसरात नागरी वस्तीत सापांचा वावर वाढला आहे.

- मधुकर ठाकूर

उरण : उरण परिसरात नागरी वस्तीत सापांचा वावर वाढला आहे.त्यामुळे सर्प दंशाच्या घटनेत ही वाढ झाली असून आठवडाभरात सहा घटना उघडकीस आल्या आहेत.सुदैवाने सर्पमित्रांच्या मदतीने  रुग्णालयात वेळीच उपचार मिळाल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.

  उरण परिसरातील जंगल, डोंगर -दऱ्या, दलदलीच्या जागा नष्ट झाल्या आहेत.परिणामी उरण परिसरात नागरी वस्तीत सापांचा वावर वाढला आहे.त्यामुळे विषारी सर्पदंशाच्या घटनाही वाढल्या असल्याचे निदर्शनास आल्या आहेत.चिरनेर येथील आशिष खारपाटील खाडीत मासेमारीसाठी गेला होता.खाडीत जाळ लावण्यासाठी जात असतानाच भक्षासाठी दबा धरून बसलेल्या अति विषारी घोणस जातीच्या सर्पाने  दंश केला.केळवणे येथील ज्योती पाटील ही महिला शेतात काम करत असताना तिलाही विषारी घोणस  सर्पाचा दंश झाला. सद्या त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार घेत असुन उपचारादरम्यान त्यांची प्रकृती स्थिर आहे.रानसई येथील मनोज खारपाटील   झाडांना पाणी देत असताना अनोळखी विषारी सर्पाचा दंश झाला.जिते येथील प्रशांत म्हात्रे याला विषारी नागाने दंश केला आहे.कासारभाट येथील तुषार पाटील यालाही अति विषारी वायपरने दंश केला होता.जोहे येथील नानु पाटील यांनाही विषारी क्रेट जातीच्या सर्पाने दंश केला होता.सर्पमित्रांच्या मदतीने रुग्णांना लागलीच रुग्णालयात दाखल केल्याने आणि विविध रुग्णालयात तातडीने उपचार मिळाल्याने आतापर्यंत

सर्पदंशाने कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याची माहिती वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांनी दिली.जंगल, परिसरात डोंगर -दऱ्या, दलदलीच्या जागा नष्ट झाल्या आहेत.त्यामुळे

 उरण परिसरात नागरी वस्तीत सापांचा वावर वाढला आहेच.त्याशिवाय मागील आठवडाभरातील परिसरातील वाढत्या सर्पदंशाच्या घटनांमुळे सापांची दहशतही वाढली असल्याचे केणी यांनी सांगितले.

टॅग्स :snakeसाप