शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

80 लाख रुपये किमतीच्या दोन दुर्मिळ खवल्या मांजरांची तस्करी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 17:27 IST

श्रीवर्धन मधील पाच जणांना सापळा रचून रंगेहाथ अटक

- जयंत धुळप

अलिबाग : अत्यंत दूर्मीळ आणि अतिसंरक्षीत वन्य संस्तन प्राणि श्रेणीतील 8० लाख रुपये किमतीच्या दोन दुर्मिळ खवल्या मांजरांच्या तस्करी करणार्‍या पाच जणांना श्रीवर्धन तालुक्यांतील वाळवटी-खेडी येथे सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात  रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकास शनिवारी सापळा लावून रंगेहाथ अटक करण्यात यश आले आहे.

    श्रीवर्धन-शेखाडी रस्त्यालगत असणा-या नजफ आराई यांच्या दानीयल फार्म येथे शनिवारी सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये फैजल अब्दुल अजीज काळोख (42, रा.घोली मोहल्ला, ता.श्रीवर्धन), निलेश अनंत कर्नेकर (3र्2े, रा.जीवनेश्वर पाखाडी, ता.श्रीवर्धन), अशोक गणपत दर्गे (55, रा.कसबापेठ, ता.श्रीवर्धन) आणि किशोर महादेव मोहिते(43, रा.खेडी ता. श्रीवर्धन) या पाच जणांचा समावेश आहे. या पाच जणांकडून जप्त करण्यात आलेल्या या दोन खवल्या मांजरांची आंतरराष्ट्रीय बाजारात किमंत 8० लाख रुपये असून, वन्य जीव संरक्षण अधिनियम सन 1972 अंतर्गत संरक्षित वर्ग -1 मधील ही प्रजाती असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांनी सांगितले.

    खात्रीशीर खबर्‍याकडून प्राप्त माहितीअंती जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर व अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोसई आर.बी. वळसंग व पोलीस पथक यांनी ही कारवाई केली आहे. पोलीसांनी जप्त केलेली दोन खवल्या मांजरे पूढील कार्यवाही करिता वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :alibaugअलिबागSmugglingतस्करी