शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरातील रुग्णांनी पालथे झोपा, रक्तातील ऑक्सिजन वाढवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 09:53 IST

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोनाग्रस्त रुग्णांना विशेषत: गृहविलगीकरणात असलेल्यांना पालथे झोपण्याचा सल्ला दिला आहे. या रुग्णांनी पालथे झोपल्यास त्यांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढते. श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर तो काही प्रमाणात कमी होतो.

निखिल म्हात्रे -अलिबाग : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येचा वाढता आलेख असतानाच सध्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे; परंतु ऑक्सिजनचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. त्यातच गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनस्तर कमी झाल्यास धावाधाव करावी लागते. त्यामुळे गृहविलगीकरणातील रुग्णांनी घरीच पालथे झोपल्यास त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढू शकते, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे घरच्या घरी उपचार घेऊन बरे होण्यासाठी जिल्हावासीयांना हा उपाय लाभदायी ठरत आहे.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोनाग्रस्त रुग्णांना विशेषत: गृहविलगीकरणात असलेल्यांना पालथे झोपण्याचा सल्ला दिला आहे. या रुग्णांनी पालथे झोपल्यास त्यांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढते. श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर तो काही प्रमाणात कमी होतो. पाठ बेडवर टेकवून उताणे झोपलेल्या रुग्णाला हळूवारपणे पोटावर झोपविण्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. ऑक्सिजनेशन नीट व्हावे म्हणून पालथे झोपविणे या पद्धतीचा स्वीकार आधुनिक वैद्यकशास्त्राने केल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.तसेच रुग्ण जर गृहविलगीकरणात असेल, तर त्याच्या ऑक्सिजनच्या तपासणीबरोबरच तापमान, ब्लडप्रेशर आणि रक्तातील साखरेची पातळी याची नियमित तपासणी केली जाते. रक्तातील ऑक्सिजनच्या प्रमाणात होणाऱ्या कमतरतेचे निदान झाले नाही, तर गुंतागुंत वाढते. वेळेवर पालथे झोपविल्यास श्वसनास मदत होते. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत, असाही तज्ज्ञांचा अनुभव आहे. त्यामुळे गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना पालथे झोपण्याचा फायदा होणार आहे.

असा वाढवा रक्तातील ऑक्सिजनपालथे झोपताना एक उशी मानेखाली, दोन उशा छातीखाली, तर दोन चेहऱ्याखाली ठेवाव्यात. अर्धा ते दोन तास पालथे व नंतर तेवढाच वेळ उजव्या कुशीवर झोपावे. नंतर अर्धा तास उठून बसावे व अर्धा तास ते दोन तास डाव्या कुशीवर झोपावे. नंतर पुन्हा पालथे झोपावे. अशा प्रकारे वारंवार स्थिती बदलणे उपयुक्त ठरते. हे दिवसात अनेकवेळा करावे. पालथे झोपल्याने श्वसन सुधारते. फुफ्फुसातील वायुकोषिका उघडल्या जातात. श्वास घेणे सुलभ होते.

त्याचे फायदे काय?शरीरातील ऑक्सिजनचा स्तर ९५च्या पुढे असणे आवश्यक आहे; परंतु कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांचा ऑक्सिजनस्तर जर त्यापेक्षा कमी असेल आणि ते रुग्ण गृहविलगीकरणात असतील, तर त्यांनी पालथे झोपण्याचा प्रयोग करावा. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा स्तर चांगला वाढतो; परंतु लक्षणे जर तीव्र स्वरूपात असतील, तर त्यांनी रुग्णालयात दाखल व्हावे.    - सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक.

तर पालथे झोपू नये -गरोदर असलेल्या महिलांनी पालथे झोपू नये. डीप व्हेन थ्रोबासिससारखे आजार, रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयाचे गंभीर आजार, पाठीचे मणके, कटिबंध, मांडीचे हाड यांचे फ्रॅक्चर असल्यास अशा रुग्णांनी पालथे झोपू नये; अन्यथा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.    - डाॅ. राजीव तंबाळे, तज्ज्ञ डाॅक्टर.

जेवणानंतर पालथे झोपू नका -जेवणानंतर कमीत कमी तासभर तरी पालथे झोपू नका. जोपर्यंत तुम्हाला सहन होईल, तोपर्यंतच पालथे झोपा. एखाद्या व्यक्तीला २४ तासही पालथे झोपणे शक्य होते; परंतु काहींना अर्ध्या तासातच कंटाळल्यासारखे होते. त्यामुळे आपल्या क्षमतेप्रमाणे पालथे झोपण्याचा प्रयोग करावा. गरज पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.    - डाॅ. अनिल फुटाणे, तज्ज्ञ डाॅक्टर. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याRaigadरायगड