शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सुधागडमध्ये अंगणवाड्यांच्या १८ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 00:52 IST

सुधागड तालुक्यात १५६ अंगणवाडी आहेत, त्यामधील ३९ बंद तर ११७ सुरू आहेत.

विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यात १५६ अंगणवाडी आहेत, त्यामधील ३९ बंद तर ११७ सुरू आहेत. यापैकी १८ इमारती धोकादायक आहेत. यामध्ये चेरफळवाडी, आपटवणे, सिद्धेश्वर खु., घेरा सरसगड, वासुंडे, वाफेघर, ढोकशेत, परळी, चंदर गाव, माढल, नेनवली, गोंडाळे, झाप, देऊळवाडा, बेघरआळी, पाली बौद्धवाडा, नागशेत या गावांतील अंगणवाड्यांच्या इमारतीचा समावेश आहे.शासन गाव तेथे मूलभूत सुविधा देण्याचे धोरण आखत असते; परंतु सुधागड तालुक्यातील ३० गावे देश स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत अंगणवाडी इमारतीपासून वंचित आहेत. इमारत नसल्याने गावातील मंदिर व समाजमंदिरात मुलांना बसविले जात आहे. यातील उद्धरआदिवासीवाडी, नेरे, गेटवाडी, तांबट माळ, हेदवली, कोशिंबळे, पावसाळवाडी, धारवाडी, वांद्रोशी, कळंब धनगरवाडी, कळंब आदिवासीवाडी, कडप्पावाडी, चव्हाणवाडी, केलगण, धोडीवली, तोरणपाडा, पाली आगरआळी, गौळमाळ, सिद्धेश्वर बु., झापतलई, दिघेवाडी, डुबेवाडी, खडसांबळे, कोंडी धनगरवाडी, नांदगाव आदिवासीवाडी, नेनवली, ठाणाळे आदिवासीवाडी यातील गावांचा समावेश असून, ३३५ मुलांना अंगणवाडी इमारत नसल्याने खासगी जागेत बसावे लागत आहे.>मिनी सेविकांची ३९ पैकी पाच पदे रिक्त१एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार सुरू असलेल्या ११७ अंगणवाड्यांतील १०६ सेविकांची पदे भरलेली आहेत, तर ११ रिक्त आहेत. मिनी सेविका एकूण ३९ पदे असून त्यातील ३४ पदे भरलेली तर पाच रिक्त आहेत.२मदतनीस एकूण ११७ पदे त्यापैकी १०३ पदे भरलेली तर १४ पदे रिक्त आहेत. सुधागड तालुक्यात ११७ अंगणवाड्यांच्या एकूण मुलांची पटसंख्या ६०५५ आहे.३बालविकास खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे व अपुऱ्या सोयीसुविधांमुळे पटसंख्या पूर्णत: कमी झाली आहे. पालकवर्गाकडून शासन व बालविकास खात्यावर नाराजी व्यक्त करून अक्षरश: खासगी बाल विद्यालयात उत्तम संस्कार घेण्यास नाइलाज म्हणून पाठविले जात आहे, असे पालकवर्गातून बोलले जात आहे.४या गंभीर बाबीची शासनाने व संबंधित खात्याने दखल न घेतल्यास आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.