शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मावळ मतदारसंघात आचारसंहिता काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सहा भरारी पथके

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 21:37 IST

पोस्टर्स, बॅनर्स तत्काळ हटविण्याची सुरुवात : राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी गतवर्षीपेक्षा १५ दिवसांचा अधिक कालावधी.

मधुकर ठाकूर, उरण : लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक शनिवारी जाहीर झाला आहे.महाराष्टातील मावळ लोकसभा मतदारसंघात १९ मे रोजी मतदान होणार आहे.त्यामुळे आजपासून लागू झालेल्या आचारसंहिता भंग होणार नाही या दृष्टीने मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या उरण, पनवेल, खालापूर या तिन्ही विधानसभा मतदारसंघात आतापासूनच जोरदार कारवाईला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरण तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण, पनवेल, खालापूर या तिन्ही विधानसभा मतदारसंघात आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याच्या दृष्टीने या क्षणापासुनच अंमलबजावणी करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.उरण, पनवेल, खालापूर या तिन्ही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन -दोन अशी सहा भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.या पथकांकडून तीनही विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे जाहिरातींचे बॅनर्स, पोस्टर्स तत्काळ हटविण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.विविध राजकीय पक्षांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी सर्व्हेक्षण करून त्याचे  व्हिडिओव्दारे चित्रीकरण करण्यासाठीही पथक तयार करण्यात आली आहेत.शासकीय विश्रामगृहात राजकीय वापर आणि राजकीय पक्षांच्या नेते, पुढारी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रवेश बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.त्याचबरोबर सर्वच सरकारी वाहने राजकीय वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.आचारसंहितेचे 

अंमलबजावणी काटेकोरपणेकरण्यासाठी व्हीव्हीटी यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.आचारसंहितेच्या तक्रारींची दखल घेऊन तत्काळ निवारण करण्यासाठी विविध मतदार संघातील भरारी पथक तैनात करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरण तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांनी दिली.

मावळ लोकसभेची मागील निवडणूक २९ एप्रिल २०१९ रोजी पार पडली होती.यावेळी मावळ लोकसभा निवडणूक १३ मे २०२४  रोजी जाहीर झाली आहे.यामुळे विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा  मावळ लोकसभा मतदारसंघात १५ दिवसांचा कालावधी अधिक मिळणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरण तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड