शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

शिवचरित्र हे अक्षय ऊर्जेचा स्रोत

By admin | Updated: February 21, 2017 06:08 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य तथा त्यागाचे प्रतीक होते. अस्मानी सुलतानी संकाटाशी निकराची झुंज देताना

नांदगाव/ मुरूड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य तथा त्यागाचे प्रतीक होते. अस्मानी सुलतानी संकाटाशी निकराची झुंज देताना असंख्य मावळ्यांसह रयतेसाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे चरित्र समाजाला आजही अक्षय ऊर्जेचे स्रोत ठरत आहे, असे प्रतिपादन पुणे येथील इतिहास अभ्यासक डॉ. माधव पोतदार यांनी केले.जंजिरा-मुरूड नगरपरिषद व शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित शिवचरित्रावर व्याख्यान देताना पोतदार बोलत होते. पोतदार म्हणाले की, शिवाजीची ओळख तलवार आणि अफझल खानाचा वध इतकी सिमित राहू नये. तर माता, मातृभूमी आणि मातृभाषा या मानदंड सगळ्याने विचार रयतेमध्ये रुजवून माणसं घडवली. स्वाभिमान जागवून परकीय शत्रूचे आक्र मण उलथून स्वराज्याची स्थापना केली. सुरतेची लूट पद्मदुर्ग व सिंधुदुर्ग उभारणीसाठी वापरून मोगल व इंग्रजांवर जरब बसवली. राष्ट्र ही संकल्पना शिवरायांनी आचरणात आणून गड-किल्ल्यांचे संवर्धन करीत युद्धशास्त्रातील नैपुण्य सिद्ध केले. शिवाजी हे व्यक्तिमत्त्व म्हणजे फक्त तलवार घेतलेला महापुरु ष नव्हे, तर परकीयांची सत्ता रोखून स्वअस्तित्वाचा झेंडा रोवणारे हे पहिले महाराष्ट्रीयन महापुरु ष होते. ज्याने विविध पगडीच्या लोकांना हाताशी घेऊन स्वराज्य मिळवण्यासाठी ज्योत प्रज्वलीत करून एक नवा अध्याय घडवला आहे. सुरतेची लूट ही किल्ल्याची डागडुजी व नवीन किल्ले बांधण्यासाठी त्याकाळात पैशांची आवश्यकता महाराजांना जाणवली म्हणूनच त्यांनी सुरतेची लूट करून गड-किल्ले बांधण्यावर जास्त भर दिला होता.या वेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा स्नेहा पाटील, उपनगराध्यक्षा नौशिन दरोगे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, वक्तृत्व स्पर्धा समितीप्रमुख सुरेश उपाध्ये, नगरसेविका मुग्धा जोशी, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, नगरसेविका युगा ठाकूर, नगरसेविका अनुजा दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त लक्ष्मीखार बापूजी देव मंदिरापासून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक शहरांतील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. पारंपरिक वाद्य खालू बाजे, तसेच सर एस. ए. विद्यालयाचे लेझीम पथक व मजगाव येथील कसरतपटूंनी आवेशपूर्ण कवायती, दांडपट्टा आदींची प्रात्यक्षिके करून दुतर्फा गोळा झालेल्या नागरिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली जोशी, दीपाली रोटकर यांनी तर आभार प्रदर्शन दयानंद गोरे यांनी केले. (वार्ताहर)