शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महापे औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची चाळण; मोकळ्या भूखंडावर झोपड्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:48 IST

समस्यांचा डोंगर : रबाळे, महापे, खैरणे, पावणे, तुर्भेत खड्डे

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर टीटीसी एमआयडीसीत रस्ते, गटारे, दिवाबत्ती, डेब्रिज, मोकळ्या भूखंडावर झोपड्यांचे वाढते अतिक्रमण, पाण्याची गळती, ड्रेनेजच्या समस्यांनी अक्षरश: या औद्योगिक क्षेत्रात समस्यांचे डोंगर निर्माण झाल्याची वाईट परिस्थिती पाहावयास मिळते.

रबाळे, महापे, खैरणे, पावणे, तुर्भे आणि नेरुळ या एमआयडीसी भागात सर्वांत मोठी समस्या आहे ती रस्त्यांची. सध्या पावसाळ्यात तर येथील बहुतांश रस्त्यांची चाळणच होताना दिसते. त्यामुळे औद्योगिक वसाहतींत येणाऱ्या वाहनचालक व कामगारांना दररोज खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्यामुळे तेथे डबकी तयार झाली आहेत. महापे एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते बांधण्यासाठी लाखो रुपयांची निविदा मंजूर झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, आठ ते दहा महिन्यांचा कालावधी उलटूनही रस्ते बनविले नाहीत. लॉकडाऊनपूर्वी फेब्रुवारीच्या सुरुवातीला विविध कामांसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजविण्यात न आल्यामुळे आजही परिस्थिती जैसे थे आहे. आता कासवगतीने खड्डे बुजविण्यासाठी तात्पुरत्या मलमपट्टीचे काम सुरू झाले आहे. हे रस्ते दुरुस्त करावे व उद्योगांना चांगली सुविधा पुरवावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.नवी मुंबई महापालिका एमआयडीसीकडून कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करते. त्यामुळे येथील रस्ते दुरुस्तीचे काम नियमानुसार त्यांनीच करायला पाहिजे. मात्र, ते करीत नसल्यामुळे एमआयडीसीला अशी कामे करावी लागतात. रबाळे एमआयडीसीच्या धर्तीवर सिमेंट काँक्रीटचे रस्ते महापेमध्ये आवश्यक ठिकाणी केले जाणार आहेत. कामाच्या निविदा कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामांना सुरुवात करण्यात येईल. - एम.एस.कलकुटकी, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी महापे

टॅग्स :Potholeखड्डे