शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

वेळास-दिघी बंदर रस्त्याची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 22:53 IST

गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता जे. एम. म्हात्रे या कंत्राटदारांनी बनवण्यास घेतला आहे

गणेश प्रभाळे दिघी : अतिवृष्टीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील वेळास ते दिघी बंदर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दिघी बंदरातील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. दिघी - माणगाव - पुणे हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग बनला आहे. त्यामुळे या मार्गावर आता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे नियंत्रण असणार आहे. मात्र, रस्ता नूतनीकरणाकडे दुर्लक्षित होत असल्याने येथील खड्ड्यांनीच प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता जे. एम. म्हात्रे या कंत्राटदारांनी बनवण्यास घेतला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग बनल्यानंतर हा रस्ता एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आला. रस्ता आहे त्या अवस्थेत वर्ग झाल्याने, रस्ता बनवण्याच्या खर्चात नवीन रस्त्याचे काम करायचे, की आहे त्या रस्त्याची मलमपट्टी करायची हा प्रश्न कंत्राटदारांसमोर आहे. रस्त्याचे काम आजही अर्धवट स्थितीत आहे, त्यामुळे त्याचा त्रास हा सामान्य जनतेला होत आहे. सद्यस्थितीत रस्त्याचे काम न केल्याने रस्ता धोकादायक बनत आहे.

गेल्या आठ - दहा वर्षांपासून वेळास ते दिघी बंदर रस्त्यावरून दिघी पोर्टकडील कोळसा व कॉइल वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. दिघी बंदर किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पावसाअगोदर या रस्त्याची डागडुजी करायला पाहिजे होती. पावसाळ्यात होणारा पाण्याचा निचरा गटारातून होणे आवश्यक आहे. मात्र, ते पाणी सध्या रस्त्यावरून वाहत असल्याने रस्ता दिसेनासा होत आहेत, परंतु दोघांनीही या गोष्टीची पूर्वदखल घेतली नाही. त्यामुळे रिक्षा, मिनीडोर, दुचाकी वाहने व सर्वसामान्य नागरिकांना खड्ड्यातून मार्ग काढताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. वेळास फरशी ते भरणा हा रस्ता खड्डेमय झाला आहे. येथे रस्त्याला सहा किलोमीटर अंतराचा घाट व तीव्र उतार असल्याने दुचाकीवरून जाताना मध्येच खड्डा आल्यास एखाद्याला जीवास मुकावे लागू शकते. रस्त्याच्या परिस्थितीनुसार दुरुस्तीकडे श्रीवर्धन तालुका लोकप्रतिनिधीने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे.रस्त्याला जोडून असणाऱ्या डोंगरातील पाणी गटाराअभावी रस्त्यावरून वाहत आहे. मुसळधार पावसाने रस्ता खचण्याची भीती आहे. यामुळे रस्त्याची दुरुस्ती लवकरच करावी. संबंधित विभागाने भोर - वरंध घाटाची पुनरावृत्ती होण्याची वाट बघू नये. - दीपक परकर, प्रवासीखड्ड्यांमुळे अपघातास निमंत्रणदिघी बंदरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. अरुंद रस्त्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होतात. दिघी - पुणे राष्ट्रीय महामार्ग झाल्याचे समजले मात्र प्रत्यक्षात महामार्ग बनायला अद्याप अवकाश आहे.दिघीपर्यंतच्या रस्त्यातील खड्डे भरायचे नियोजन आहे. या महिन्यापासून पुन्हा रस्त्याचे काम सुरू होईल. - सचिन निफाडे, उपअभियंता.लोकप्रतिनिधींना नाही देणेघेणेजनसेवेसाठी श्रीवर्धन मतदार संघातील आमदार, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्य निवडून दिले गेलेत मात्र, जनतेच्या विशेषत: रस्त्याबाबत असुविधेकडे सर्रास दुर्लक्ष होते.वाहनांचे होतेय नुकसानविशेष म्हणजे खड्डे पडलेल्या या रस्त्यावरून जाताना महिला, रुग्ण यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय रोजच्या प्रवासात वाहनांचे देखील नुकसान होत आहे. संबंधित प्रशासनाने या रस्त्याच्या डागडुजी किंवा दुरुस्तीकडे लक्ष दिले नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा कुडगाव येथील रहिवासी महेश जाधव यांनी दिला आहे.