शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरच्या वापरानंतर ९० रुग्णांना साइड इफेक्ट; रायगडमध्ये वापर थांबवण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 06:15 IST

रायगडमध्ये वापर थांबवण्याचे आदेश

रायगड : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरामुळे ९० रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तत्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील हेटेराे हेल्थ केअर कंपनीकडून पुरवण्यात आलेली रेमडेसिविर इंजेक्शन्स मागे घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

२८ एप्रिल राेजी जिल्ह्यासाठी हेटेराे हेल्थ केअर कंपनीकडून सुमारे ५१० रेमडेसिविर इंजेक्शन पुरवण्यात आले हाेते. पैकी ३१० इंजेक्शन जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रुग्णालयांना देण्यात आले हाेते. २९ एप्रिल राेजी तेथील रुग्णांना सदरचे इंजेक्शन टाेचल्यानंतर सुमारे ९० रुग्णांना थंडी आणि ताप आल्याच्या तक्रारी आल्या. त्यानंतर संबंधित कंपनीच्या विनंतीवरूनच इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना दिले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती  यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना  दिली.

रुग्णांना काही प्रमाणात त्रास झाल्याच्या तक्रारी पुढे आल्यानंतर काही तांत्रिक कारणाने कंपनीने काेविकाेफर नावाच्या बॅच नंबर एचसीएल २१०१३ इंजेक्शनचा वापर थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर पेण येथील रायगडच्या सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाने इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना दिले आहेत.  काेणत्या रुग्णालयातील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनचा त्रास झाला याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट  केले.

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरRaigadरायगड