शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत दुय्यम निबंधक कार्यालयात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:09 IST

इंटरनेट अभावी काम बंद; नागरिक दस्त नोंदीसाठी प्रतीक्षेत

- कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ तसेच कर्जत तहसील कार्यालयातील दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज मागील सहा महिन्यांपासून अनियमितपणे सुरू असून इंटरनेटअभावी दस्त नोंदणीचे काम खोळंबले आहे. परिणामी, ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना खोळंबून राहावे लागत आहे. खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहेत. महसूल विभागाने या संदर्भात लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.कर्जत तालुक्यात सध्या नेरळ व कर्जत तहसील कार्यालयात असलेले दुय्यय निबंधक कार्यालय येथे दस्त नोंदणीकृत करण्यासाठी व्यवस्था आहे. मात्र, मागील सहा महिन्यांपासून कधी सर्व्हर डाउन तर कधी इंटरनेट नाही, या कारणांनी दस्तनोंदीचे काम ठप्प झाले असून याचा फटका ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना बसत आहे. त्यांना तासन्तास खोळंबून राहावे लागत आहे. काही वेळा दस्तनोंदीसाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागत असल्याचे विदारक चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे.सर्व सामान्यांच्या स्वप्नातल्या घराची खरेदी, जमीन मिळकत, फ्लॅट खरेदी-विक्री, हक्कसोड पत्र या शिवाय अनेक जमीन-जुमला व्यवहारात दस्त नोंदणी करणे हे महत्त्वाचे आहे. यासाठी शासनाने दुय्यम निबंधक कार्यालयात व्यवस्था केली आहे. मात्र, आज सर्वत्र डिजिटल इंडिया म्हणून ओळख निर्माण झालेल्या आपल्या देशात इंटरनेट सेवा मात्र कोलमडून पडत आहेत. मागील २०-२५ दिवसांत कर्जत तालुक्यातील दोन्ही कार्यालयात एकही आॅनलाइन दस्त नोंदणी झाली नसल्याचे समजते.कर्जत तालुक्यातही दोन्ही दस्त नोंदणी कार्यालयात इंटरनेट बंद असल्याची कारणे सांगून दस्त नोंदणी ठप्प झाली आहे. माझ्या जमिनीच्या १८ खातेधारकांना दरवेळेस एकत्र करून मी ३० ते ३५ किलोमीटर अंतरावरून कर्जत दुय्यम निबंधक कार्यालय गाठतो. मात्र, इंटरनेट बंद असल्यास रिकाम्या हाती फिरावे लागते, यामुळे वेळ आणि पैसा वाया जात आहे.- भरत खडेकर, शेतकरी, बोरगाव, कर्जतनेरळ दुय्यम निबंधक कार्यालयात आॅक्टोबर २०१९ पासून इंटरनेट सेवा सुरळीत नसल्याने कामकाजात अडचणी येत आहेत. या संदर्भात वरिष्ठांना, दूरसंचार कंपनीस वेळोवेळी कळविले आहे. मात्र, बीएसएनएलची इंटरनेट सेवा सुरळीत झाली नाही. त्यामुळे या फेब्रुवारी महिन्यात तर फक्त दहा तासच कामकाज होऊ शकले आहे. व्हीपीपीएन या प्रायव्हेट कंपनीच्या इंटरनेटसाठी प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.दुय्यम निबंधक कार्यालयातील अनियमित कामाकाजामुळे आमच्या पक्षकारांना खोळंबून राहावे लागत आहे. दस्तनोंदणी प्रक्रिया आॅनलाइन आहे. इंटरनेट बंद असल्यास प्रक्रिया थांबली जाते. त्यामुळे दोन्हीही पक्षकारांना आपल्या दस्त नोंदणीची प्रतीक्षा करावी लागत आहे.- अ‍ॅड. शाकीब पानसरेरस्त्याच्या खोदकामाचा फटका बीएसएनएललापनवेल, खालापूर, खोपोली महामार्गावर महानगर गॅस पाइपलाइनचे काम सुरू आहे. त्यासाठी जेसीबी मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेने टाकलेल्या बीएसएनएलच्या केबल बाधित होत असून, वारंवार इंटरनेटसेवा खंडित होत आहे.