शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धनमध्ये कचऱ्यापासून खतनिर्मिती सुरू; नगरपालिकेचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 23:44 IST

संकलित कचऱ्याची योग्य विल्हेवाट; नागरिकांकडून कौतुक

- संतोष सापते श्रीवर्धन : येथील नगरपालिकेने शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देत विविध भागांतील संकलित कचऱ्याची योग्य पद्धतीने खतनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पाला २०१३ मध्ये सुरुवात झाली होती. मात्र, तत्कालीन खतनिर्मिती करणाऱ्या संस्थांना या प्रकल्पाद्वारे खतनिर्मिती करण्यात अपयश आले. आजमितीस हा प्रकल्प यशस्वी होत असताना दिसत आहे. खतनिर्मितीला वेग आल्याने संकलित कचऱ्याचे निर्मूलन शक्य झाले आहे. यापूर्वी प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणात कचºयांचे ढीग निदर्शनास येत होते.

श्रीवर्धन नगरपालिका नियमित स्वच्छता कर्मचाºयांच्या मार्फत शहरातील विविध भागांत स्वच्छता मोहीम राबवत असल्याचे निदर्शनास येते. नगरपालिका स्वच्छतेविषयी जनजागृतीसाठी विविध सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच नियमित स्वच्छतेविषयीची माहिती जनतेपर्यंत पाठवण्याचे काम केले जात आहे. नगरपालिका कचऱ्याचे वर्गीकरण सुका व ओला असा करत आहे, त्यामुळे खतनिर्मिती करणे सोपे झाले आहे. हा प्रकल्प अनेकदा श्रीवर्धनमधील जनेतच्या चर्चेचा विषय बनला होता. पावसाळ्यात प्रकल्प परिसरात जमा कचºयाची समस्या सर्वसामान्य व्यक्तींसाठी डोकेदुखी ठरत होती. या वर्षी खतनिर्मितीसाठी नगरपालिका प्रशासनाने योग्य यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे शहरातील जमा कचºयापासून तत्काळ खतनिर्मिती शक्य होणार आहे.

निर्मित खत हे शेतीसाठी उपयुक्त असून, स्थानिक शेतकऱ्याना सहज उपलब्ध होत आहे. कोकणात नारळ, सुपारी, काजू या पिकांसाठी अनुकूल वातावरण असते. नगरपालिकेकडून अल्प दरात शेतकऱ्यांसाठी खत उपलब्ध झाल्यास त्याचा निश्चितच फायदा सर्वसामान्य शेतकºयाला होऊ शकतो. निर्मित खत हे चार रुपये व सहा रुपये दराने विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. संचित कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने सयंत्राद्वारे विलीनीकरण करून खत निर्माण केले जात आहे.

श्रीवर्धन नगरपालिका स्वच्छता अभियान राबविण्यात यशस्वी ठरत आहे. सर्वसामान्य नागरिक अतिशय चांगला प्रतिसाद देत आहेत. कचºयापासून खतनिर्मितीला वेग प्राप्त झाला आहे. शेतकरी वर्गासाठी माफक दरात खत उपलब्ध केले आहे.- जितेंद्र सातनाक, नगराध्यक्ष, श्रीवर्धन

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र