शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

श्रीवर्धन नगरपालिकेचा लाखोंचा निधी वापराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:47 IST

रायगड जिल्ह्यात निसर्गाचे वरदान लाभलेल्या श्रीवर्धनमध्ये सध्या पर्यटकांचा ओघ वाढत आहे. त्या दृष्टीने श्रीवर्धन नगरपालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा ७ कोटी ५० लाख ९९ हजार २४८ रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला

संतोष सापते श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यात निसर्गाचे वरदान लाभलेल्या श्रीवर्धनमध्ये सध्या पर्यटकांचा ओघ वाढत आहे. त्या दृष्टीने श्रीवर्धन नगरपालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा ७ कोटी ५० लाख ९९ हजार २४८ रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला नक्कीच चालना मिळेल, असे वाटत असले तरी अद्याप पर्यटन विकासासाठी निधीची तरतूद न केल्याने स्थानिक व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे.श्रीवर्धन ही बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची जन्मभूमी आहे. चौफेर विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळ-सुपारीच्या बागा पर्यटकांना आकर्षित करतात. श्रीवर्धन नगरपालिकेने पर्यटक निधीची अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली. मात्र, निधीचा वापरच केला नाही. २०१७च्या आकडेवारीनुसार, प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या खर्चासाठी एक कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली होती; पण त्यातून ३० लाख २७ हजार रु पयेच खर्च करण्यात आले.नगरपालिकेच्या करातून ९६ लाख ३६ हजार रु पयांचा महसूल मिळणे अपेक्षित होते; परंतु आठ महिन्यांत कर स्वरूपात फक्त ४० लाख इतकाच महसूल गोळा झाला आहे. नगरपालिकेला अनुदान व अंशदान म्हणून दोन कोटी सहा लाखांचा निधी गृहीत धरण्यात आला होता. मात्र, अजूनही अनुदान मिळालेले नाही. श्रीवर्धनमध्ये वाहतूककोंडी होत आहे. नगरपालिकेने रस्तेदुरुस्ती देखभालीवर शून्य खर्च केला आहे.श्रीवर्धनकडे पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता, नगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी पर्यटनगृहाची इमारत बांधली, त्यासाठी लाखो रु पये खर्च केला. वाजतगाजत इमारतीचे उद्घाटनही झाले. त्यानंतर हे पर्यटन निवास कंत्राटी पद्धतीने चालवण्यास देणे अपेक्षित होते. मात्र, जाचक अटी-शर्तींमुळे त्यास प्रतिसाद मिळाला नाही. पर्यायाने २०१६-१७मध्ये लाखो रु पये खर्च केलेल्या वास्तूमधून नगरपालिकेला अवघे १०० रु पये मिळाले. मालमत्ता सर्वेक्षणासाठी ४० लाखांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली.सरकारच्या ‘राष्ट्रीय मत्स्यकी विकास बोर्ड, हैदराबादच्या योजनेंतर्गत श्रीवर्धन नगरपालिकेला आधुनिक मच्छी मार्केटची इमारत बांधण्यासाठी मे २०१२मध्ये दोन कोटी १२ लाख रु पयांचा निधी मंजूर झाला. पाच वर्षे उलटून गेली, तरी अद्याप त्याचा विनियोग झालेला नाही. त्यामुळे मत्स्यविक्रीवरही परिणाम होत आहे. निधी असूनही त्याचा वापर होत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे.कचरा विल्हेवाटीसाठी प्रकल्प ६४ लाखांचा निधी खर्च१श्रीवर्धन नगरपालिकेने मार्च २०१३मध्ये कचºयाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला. त्यावर आतापर्यंत ६४ लाखांहून अधिक निधी खर्च झाला आहे. अद्याप त्या प्रकल्पातून शून्य उत्पन्न मिळाले आहे. बाराव्या वित्त आयोगाच्या निधीतून घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत मिश्र कचºयातून जौविक पद्धतीने यंत्राद्वारे सेंद्रिय खत निर्माण करणारा सदरचा प्रकल्प उभारला आहे.२पर्यटकांसाठी समुद्रकिनाºयावर बांधलेली स्वच्छतागृहे उद्घाटनानंतर बंद आहेत. त्यांचा उपयोग नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाच्या जाहिरातीसाठी होत आहे. पर्यटकांची मात्र चांगलीच गैरसोय होत आहे. येथील स्मशानभूमीचीही दुरवस्था झाली असून, पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना अडचणी येत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.पर्यटन निवासाची वास्तू कंत्राटी स्वरूपात चालवण्यास द्यायची होती; परंतु त्यास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्या कारणे ठराव घेऊन नगरपालिका स्वत: हा पर्यटन निवास चालवणार आहे. शहरात अनेक पर्यटनपूरक प्रकल्प राबवले आहेत.- नरेंद्र भुसाणे, नगराध्यक्ष, श्रीवर्धनश्रीवर्धन नगरपालिका निधीची तरतूद करते. मात्र, प्राप्त होणाºया निधीतूनच कामे करण्यात येतात. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, समुद्रकिनारी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. मच्छी मार्केटचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.- अर्चना दिवे, मुख्याधिकारी, नगरपालिका, श्रीवर्धनश्रीवर्धनमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र, सोयी-सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होते. पर्यटन निवास पर्यटकांसाठी लवकरात लवकर उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे रस्त्यांची दुरुस्ती, कचरा व्यवस्थापनावर भर दिला पाहिजे.- सुरेश करडे, रहिवासी, श्रीवर्धन