शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

अलिबाग जिल्ह्यात आनंदाने झाला श्रीगणेशा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 11:50 IST

महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या सणांपैकी कोकणात सर्वात मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा होणारा सण म्हणून गणेशोत्सवाकडे पाहीले जाते.

-निखिल म्हात्रे

अलिबाग - जिल्ह्यात गणेशोत्सवाला मंगळवारपासून धुमधडाक्यात व भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील घरोघरी विघ्नहर्ता गणरायाची मनोभावे प्राण प्रतिस्थापना करून आपल्या आराध्य दैवत असणाऱ्या गणेश बाप्पाच्या सेवेत रममाण झाले आहे. त्यामुळे ग्रामिण भागासह शहरीभागात ही नवचैतन्य निर्माण झाले असून बाप्पाच्या समोरील भजन, किर्तन व धावरे नाचाने रात्री जागू लागल्या आहेत.

महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या सणांपैकी कोकणात सर्वात मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा होणारा सण म्हणून गणेशोत्सवाकडे पाहीले जाते. हा सण म्हणजे कोकणकरांसाठी जणू आनंदच आसतो. यानिमित्ताने घराघरात दिड, पाच, सात, नऊ, आकरा, सतरा व एकविस दिवसाचे गणराय विराजमान झाले असून सर्वजण आपापसातील मतभेद, दु:ख, चिंता बाजूला सारून गणेशाच्या भक्तीते तल्लीन झाले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नोकरी निमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानी गावागावात दाखल झाले असून घरातील सदस्य यानिमित्ताने एकत्र आले आहेत.

एकूण आपल्या लाडक्या बाप्पाच्या पुजनासाठी मंगळवारी सकाळपासूनच लगबग दिसून आली होती. जिल्ह्यात प्रत्येक गावागावात आपापल्या रुढी परंपरेनुसार गणरायाचे पुजन झाले. आजही ग्रामिण भागात पुरोहीतांकडून पुजापाठ करून विधीवत पुजन करण्याची प्रथा आहे. तर काही ठिकाणी पुरोहीता अभावी घरातील जेष्ठांकडून बाप्पाचे पुजन होते. जिल्ह्यात गणपती पुजनानंतर विविध कार्यक्रम हि पार पाडण्यात आले होते. जिल्ह्यात गणपती बाप्पाचा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन हि सज्ज झाले आहे. तसेच कोकणात येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना रायगड पोलिसांकडून मास्क, पाणी बाॅटल व बिस्कीट दिले जात आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या या नव्या संपल्पनेचे गणेश भक्तांकडून स्वागतच होत आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग