शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणी सोमवारीही घारापुरी बेटावरील लेण्या बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 06:38 IST

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी देशभरातील विविध शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी उसळते. मात्र घारापुरी बेटावरील हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या अतिप्राचीन शिवलिंगाचे प्रवेशद्वार सोमवारीच बंद ठेवले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी देशभरातील विविध शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी उसळते. मात्र घारापुरी बेटावरील हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या अतिप्राचीन शिवलिंगाचे प्रवेशद्वार सोमवारीच बंद ठेवले जात आहे. पुरातत्व विभागाच्या आडमुठे धोरणामुळे बेटावर येणाºया हजारो देशी-विदेशी पर्यटक भाविकांना शिवदर्शनाला मुकावे लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींकडूनही दुर्लक्षच होत असल्याने शिवभक्तांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे.घारापुरी बेटावर कलचुरी घराण्याच्या कारकिर्दीत कोरण्यात आलेल्या इ. स. सहाव्या शतकातील अतिप्राचीन कोरीव लेण्या आहेत. काळ्या पाषाणात योगेश्वर शिव, रावणानुग्रहमूर्ती, शिवपार्वती अक्षक्रीडा, अर्धनारीनटेश्वर, गंगावतरण शिव, शिवपार्वती विवाह, अंधकारवरधमूर्ती, नटराज शिव आणि महेशमूर्ती अशी शिवाची विविध रूपे या शिल्पात अद्भुतरीत्या कोरलेली आहेत. याबरोबर लेणी परिसरातील विविध गाभाºयात अतिप्राचीन चार शिवलिंगे आहेत. त्यापैकी लेण्यांच्या पश्चिमेला पण पूर्वाभिमुख शिवमंदिर सुमारे २० चौ. मी. छतापर्यंत भिडलेले आहे. मंदिरात चौकोनी शाळुंका असून अगदी तिच्या मधोमध विशाल शिवलिंग आहे. त्या शिवमंदिरासमोरच महाकाय सदाशिवमूर्ती (महेशमूर्ती) आहे. पर्यटकांसाठी सदाशिवमूर्तीच घारापुरी लेण्यांचे मुख्य आकर्षण आहे. शिवाची सकल आणि निष्लंक अशी दोन रूपे आढळतात. अशी ही शिवाची अद्भुत शिल्पे पाहण्यासाठी देश-विदेशी पर्यटकांची वर्षभर नेहमीच गर्दी असते. मात्र वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा लाभलेल्या घारापुरी लेण्या प्रत्येक सोमवारी घारापुरी लेणी पर्यटकांसाठी बंद ठेवली जाते. पुरातन विभागाकडून दुरुस्ती, देखभालीसाठी आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी लेण्या पाहण्यासाठी बंद ठेवल्या जात असल्याने शिवभक्तांमध्ये नाराजी आहे. प्रत्येक सोमवारी घारापुरी लेण्या पाहण्यासाठी बंद ठेवण्यात येत असल्या तरी मुंबई गेटवे आॅफ इंडिया येथून हजारो पर्यटकांची फसवणूक करीत प्रवासी लाँचेस पर्यटकांना घेवून बेटावर येतात. मात्र लेण्या पाहण्यासाठी बंद असल्याने हजारो शिवभक्त पर्यटकांना शिवदर्शनास मुकावे लागत आहे. यामुळे किमान श्रावणातल्या सोमवारी शिवदर्शनासाठी पुरातत्व विभागाने लेण्यांचे प्रवेशद्वार पर्यटक शिवभक्तांसाठी खुले करावे, अशी मागणी घारापुरी बेटवासीयांची आहे. अजिंठा, वेरुळप्रमाणे घारापुरी बंदचा दिवस बदलण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे ग्रा. पं. सदस्य बळीराम ठाकूर आणि ग्रामस्थांची आहे. यासाठी त्यांनी खा. श्रीरंग बारणे, उरण आ. मनोहर भोईर यांनाही निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे खासदार, आमदारांसह पुरातत्व विभागाकडून दुर्लक्षच केले जात आहे.