शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बोटावर मतदानाची शाई दाखवा, हॉटेलात १० टक्के सूट मिळवा!

By निखिल म्हात्रे | Updated: April 9, 2024 18:54 IST

ही योजना अलिबाग शहरातील प्रमुख हाॅटेल व्यावसायिकांनी तयार केली आहे.

अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध क्लृप्त्या लढविल्या आहेत. यामध्ये आता हाॅटेल व्यावसायिक सहभागी झाले आहेत. बोटाला मतदान केल्याची शाई दाखवा आणि १० टक्के डिस्काउंट मिळवा, अशी योजना अलिबाग शहरातील प्रमुख हाॅटेल व्यावसायिकांनी तयार केली आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी अलिबाग शहरातील हाॅटेल व्यावसायिकांची बैठक घेतली होती. त्यामध्ये लोकशाहीचा जागर करीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी हाॅटेल व्यावसायिकांना सहभागी केले.

मतदान करा, शाई दाखवा आणि हाॅटेलमध्ये १० टक्के सूट मिळवा अशी संकल्पना हाॅटेल व्यावसायिकांची आहे. ७ ते १० मे २०२४ पर्यंत अनेक हाॅटेलमध्ये जेवणावर १० टक्के सूट मिळणार आहे. सर्वांनी आपल्या बहुमोल मताचा हक्क बजवावा आणि मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी असा उपक्रम हाती घेतला आहे.७ मे २०२४ रोजी सकाळपासून ही संधी खुली असेल. त्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले.  मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आपण विविध संकल्पना राबवित आहोत. त्यातच येथील नागरीकांना हाॅटेलींग अवडत असल्याने त्याकडे फोकस करून हि संकल्पना राबविली आहे. जेणे करून मतदानाचा टक्का वाढेल.- विक्रम पाटील, अलिबाग तहसिलदार.

टॅग्स :alibaugअलिबाग