शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 02:32 IST

शिवसेनेने ‘मराठी माणूस’ हा मुद्दा बनवत कोकणात विस्तार केला. बाळासाहेबांचा करिश्मा होता त्यामुळे जनतेने शिवसेना स्वीकारली, परंतु आता जुनी शिवसेना संपली आहे. स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही.

श्रीवर्धन : शिवसेनेने ‘मराठी माणूस’ हा मुद्दा बनवत कोकणात विस्तार केला. बाळासाहेबांचा करिश्मा होता त्यामुळे जनतेने शिवसेना स्वीकारली, परंतु आता जुनी शिवसेना संपली आहे. स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही. मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडे आहे. मराठी माणूस हालअपेष्टा सहन करत जीवन जगत आहे. कुठेही विकास दृष्टीस पडत नाही. मनोहर जोशी, नारायण राणे कोकणातून मुख्यमंत्री झाले, परंतु कोकणास काय मिळाले? मुंबई-गोवा रस्ता होऊ शकला नाही. शेतीचा विकास झाला नाही, उद्योग कोकणात आले नाही त्या कारणे तरु णांना काम मिळाले नाही, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केले.श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने नगरपालिका मैदानावर सोमवारी सायंकाळी सभेचे आयोजन केले होते. या सभेस संबोधित करताना अजित पवार बोलत होते. विद्यमान राज्य सरकार सर्वत्र अपयशी ठरले आहे. राज्यातील १३ हजार शाळा बंद केल्या आहेत, ६७ हजार बालके कुपोषित झालेले आहेत. सीमा भागात शत्रू राष्ट्र दररोज हल्ले चढवत आहे,परंतु ५६ इंच छाती कुठे गेली? असा प्रश्न करत आज याचा शोध घ्यावा लागेल, अशी पवार यांनी पंतप्रधान यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा सांगणारे राज्य आहे. भाजपा व सेना यांच्या युती सरकारने राज्यातील बहुजन समाज संकटात सापडला आहे. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात कोरेगाव भीमासारखी घटना लाजिरवाणी आहे. त्यामुळे सामाजिक शांती नष्ट होत आहे. युती सरकार लोकांच्या भावनांशी खेळत आहे. जीएसटी व नोटाबंदीमुळे सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन कष्टमय झाले आहे. सण-उत्सव साजरे करणे अशक्य झाले आहे. आम्ही धनगर, मराठा व मुस्लीम या समाजांसाठी आरक्षण दिले, परंतु युती सरकार ते टिकवण्यात अयशस्वी झाले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मनोगतात श्रीवर्धन तालुक्यातील विकासकामे व जनतेचा विकास या विषयी विचार व्यक्त केले. याकार्यक्र मप्रसंगी अनिकेत तटकरे व अदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.श्रीवर्धनमधील भुवनाळे तलाव, समुद्र किनारी व शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅ मेरेबसवण्यात आले. तसेच श्रीवर्धन शहरात लघुदाब भूमिगत विद्युत वाहिनीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार