शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा

By admin | Updated: June 19, 2016 04:15 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी तमाम हिंदूंना वाचविण्याचे काम केले आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक हिंदूने किल्ले रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हायलाच हवे, असे आवाहन

महाड : छत्रपती शिवाजी महाराजांनी तमाम हिंदूंना वाचविण्याचे काम केले आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक हिंदूने किल्ले रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हायलाच हवे, असे आवाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी किल्ले रायगडावर केले.शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समिती, दुर्गराज रायगड, जिल्हा परिषद आणि कोकणकडा मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी रायगड किल्ल्यावर तिथीनुसार शिवराज्यभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आ. भरत गोगावले, आ. महादेव जानकर, आ. विनायक मेटे, आ. प्रकाश सुर्वे, आ. मनोहर भोईर, आ. रूपेश म्हात्रे, बजरंग दलाचे प्रमुख राजेश पांडे, शिवरायांचे वाई येथील वंशज विजयाताई भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. कदम पुढे म्हणाले, की शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर आल्याने आपल्याला शिवकाळाचा आभास होतो, छत्रपती सिंहासनावर आरूढ झालेले आहेत. राजमाता जिजाऊ, राणी सोयराबाई, अष्टप्रधान मंडळ बाजूला बसलेले आहे. वातावरणाचा, शिवकाळाचा भास आपल्याला झाल्याचे कदम यांनी सांगितले. यावेळी विजयाताई भोसले यांनी शिवराज्याभिषेक दिन हा तिथीप्रमाणेच साजरा व्हायला हवा, असे सांगितले. आ. भरत गोगावले, राजेश पांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सोहळ्यापूर्वी श्रीधारेश्वर महाराज आणि शंकर जंगम वृदांनी विधिवत राज्याभिषेकाचे विधी केले. यावेळी सनी तांडेल या दाम्पत्याला शिवप्रतिमेवर अभिषेक करण्याचा मान देण्यात आला. या प्रसंगी राजदरबार ते श्री जगदीश्वर मंदिर, समाधीस्थळापर्यंत ढोलताशांच्या गजरात व शिवजयघोषात शिवप्रतिमेची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. (वार्ताहर)