शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

शिवराज्याभिषेक दिन सोहळाआज; किल्ले रायगडावर २२ मंडप, १०९ सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 08:59 IST

जिल्हा प्रशासनाकडून विविध समित्या स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: शिवराज्याभिषेकला ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने रायगडावर शुक्रवारी होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यासाठी गडावर  २२ मंडप, १०९ सीसीटीव्ही कॅमेरे, १५ वैद्यकीय मदत केंद्रे आदी सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर येणार आहेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने विविध समित्या स्थापन केल्या आहेत.

प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी गडावर ५०० लिटरच्या ५० टाक्यांची सुविधा केली आहे. ८ आरओ लावण्यात आले आहेत. १ लाख पाण्याच्या बाटल्यांची सुविधाही आहे. गडावर २२ मंडपांची व्यवस्था केली असून,  ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. रायगडपासून पाचाडपर्यंत १०९ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. १७ ठिकाणी ‘पब्लिक अलाऊंस सिस्टम’ असून सोहळा पाहण्यासाठी ९ एलईडी सुविधाही उपलब्ध केल्या आहेत. शिवप्रेमींच्या आरोग्याच्या दृष्टीने १५ वैद्यकीय केंद्रे तयार करण्यात आली आहेत. 

१०० बसची सुविधा

राज्यातून या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभक्त आपली वाहने घेऊन येणार आहेत.  त्यांच्यासाठी  पार्किंगची सुविधा  केली आहे. १२ ठिकाणी ही सुविधा आहे.  पार्किंगपासून पाचाडपर्यंत जाण्यास राज्य परिवहनच्या १०० बसगाड्यांची सुविधा आहे. 

दीड हजार सुरक्षा कर्मचारी तैनात

शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यासाठी  १७० पोलिस अधिकारी, १२०० पोलिस कर्मचारी, ३५० होमगार्ड, १ एसआरपी प्लाटून असा १५०० पोलिस कर्मचारी-अधिकारी तैनात असणार आहे. १५० वॉकीटाकी उपलब्ध आहेत. रायगडावर कंट्रोल रूम बनविण्यात आली असून प्रत्येक विभागाचा पीआरओ या ठिकाणी असणार आहे. आपत्तीच्या अनुषंगाने पूर्ण तयारी केली आहे.

किल्ले रायगडावरील शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. हा सोहळा घरी बसूनही पाहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरबसल्या सोहळ्याचा आनंद लुटावा.  शिवभक्तांनी नियमाचे पालन करून सोहळ्याचा आनंद लुटावा. -किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड

टॅग्स :Raigadरायगड