शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीची डिजिटलायझेशनकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:16 IST

सुरक्षेसाठी सीसीटीव्ही : वेळेवर कर भरणाऱ्यांना विशेष सवलत

वैभव गायकरपनवेल : पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीने रहिवाशांच्या सुरक्षेसाठी व सक्षमीकरणासाठी नवीन पॅटर्न तयार केला असून, गावाची डिजिटलाईज वाटचाल सुरू आहे.

शिवकर ग्रामपंचायतीने डिजिटलायझेशनच्या दृष्टीने लोकसहभागातून अनेक गोष्टी उभारण्यात आलेल्या आहेत. गावात सुरक्षेच्या दृष्टीने १६ सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. या व्यतिरिक्त प्रोजेक्टर, साउंड सिस्टीम, रस्त्याच्या दुतर्फा पामची झाडे आदी लावण्यात आली आहेत.

सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च करण्यात आले असून मुख्य रस्ते, शाळा, वर्दळीच्या ठिकाणी ते लावण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सरपंच अनिल ढवळे यांनी दिली. घरपट्टी तसेच पाणीपट्टी वेळेवर भरणाºया ग्रामस्थांना मोफत धान्य दळून देण्याची योजना ग्रामपंचायतीने अमलात आणली आहे, याकरिता गावातील तीन राईस मील सोबत ग्रामपंचायतीने बोलणी केली आहे. ग्रामस्थांनी कर वेळेवर भरल्यास ग्रामपंचायतीला विविध देयके देण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत नाहीत, अथवा व्याजापोटी इतर खर्च वाढू नये, हा या मागचा उद्देश आहे.

सध्याच्या घडीला गावची लोकसंख्या २४३४ असून, एकूण क्षेत्रफळ २६१ हेक्टर आहे. यापैकी १६८ हेक्टर जागेवर शेती केली जाते. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रेरित केली जाते. याकरिता निम्मा खर्च ग्रामपंचायत उचलते. संपूर्ण नैसर्गिकरीत्या भातशेती करणाऱ्या शेतकऱ्याकडून ग्रामपंचात शासनाच्या जादा दराने भात खरेदी करते. सध्याच्या घडीला प्रतिक्विंटल १७५० रुपये शासन शेतकऱ्याला भाव देते. ग्रामपंचायत प्रतिक्विंटल २००० रुपयाचा भाव देते. सेंद्रिय शेतीद्वारे पिकवलेले धान्य ग्रामपंचायत प्रदर्शन भरवून २००० अधिक ५०० रुपये आकारून विक्री करेल, अशी योजना ग्रामपंचायत सरपंच अनिल ढवळे यांनी आखली आहे.

डिजिटल दवंडीग्रामपंचायत क्षेत्रात कोणतीही सूचना द्यावयाची दवंडी पिटली जाते. याचा अर्थ ग्रामपंचायतीने नेमलेला कर्मचारी गावात जाऊन प्रत्येक चौकात ओरडून सर्वांना माहिती देतात. मात्र, सध्याच्या डिजिटल युगात ग्रामपंचायतीने गावातील महत्त्वाच्या चौकात कायमस्वरूपी स्पीकर लावले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयातून दिलेल्या सूचना थेट ग्रामस्थांना ऐकायला येतात. विशेष म्हणजे, ग्रामसभादेखील अशाचप्रकारे लाइव्ह ग्रामस्थांना ऐकायला मिळतात.

शोषखड्ड्याद्वारे सांडपाण्याचा निचराशहरामध्ये देखील सांडपाण्याचे नियोजनाचे तीन-तेरा उडाले असताना, शिवकर गावात सुमारे २०० शोषखडे खोदण्यात आलेले आहेत. या खड्ड्यामध्ये गावातील सांडपाणी जिरविले जाते.

उद्दिष्ट नंबर एकचेग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असून डिजिटलायझेशनच्या माध्यमातून काम करणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे. मात्र, राज्यातही आदर्श ग्रामपंचायत बनण्याचा मान मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सरपंच अनिल ढवळे यांनी सांगितले.

टॅग्स :digitalडिजिटलpanvelपनवेल