शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

उरणमध्ये शिवसमर्थ स्मारक, जेएनपीटी करणार ३० कोटी खर्च , फेब्रुवारी २०१९ पर्यंत स्मारक प्रत्यक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:34 IST

शिवरायांच्या राजधानीतच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात जेएनपीटी प्रशासन शिवसमर्थ स्मारक उभारणार आहे. दास्तान फाटा येथील जेएनपीटीच्या प्रवेशद्वारावरच दोन एकर क्षेत्रातील १६०० स्क्वेअर मीटरमध्ये २० फूट उंचीचा श्रीसमर्थ आणि शिवरायांचा उभा भव्य पूर्णाकृती ब्राँझचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

उरण : शिवरायांच्या राजधानीतच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात जेएनपीटी प्रशासन शिवसमर्थ स्मारक उभारणार आहे. दास्तान फाटा येथील जेएनपीटीच्या प्रवेशद्वारावरच दोन एकर क्षेत्रातील १६०० स्क्वेअर मीटरमध्ये २० फूट उंचीचा श्रीसमर्थ आणि शिवरायांचा उभा भव्य पूर्णाकृती ब्राँझचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पासाठी जेएनपीटी सुमारे ३० कोटी खर्च करणार आहे. तर २० फुटी उंच ब्राँझच्या पुतळ्याच्या कारागिरीवरच एक कोटी ९५ लाख खर्च होणार आहेत. फेब्रुवारी २०१९पर्यंत शिवसमर्थ स्मारक प्रत्यक्षात अवतरणार आहे.जेएनपीटी बंदराच्या उभारणीनंतर जेएनपीटी अंतर्गत खासगीकरणाच्या माध्यमातून आणखी तीन खासगी बंदरे अस्तित्वात आली आहेत. देशातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनण्याच्या तयारीत असलेल्या नवी मुंबई परिसरातील नवी मुंबई विमानतळ, शिवडी-न्हावा शेवा सी लिंक आदी महत्त्वाक ांक्षी प्रस्तावित प्रकल्पही उभारण्याची सुरुवात झाली आहे. नुकताच नवी मुंबई विमानतळाच्या पायाभरणी आणि जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. त्यानंतर आता छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण येथे शिवसमर्थ स्मारक उभारण्याची तयारी जेएनपीटीने सुरू केली आहे. सुमारे ३० कोटी खर्चाचा हा प्रस्तावित प्रकल्प आहे. त्यापैकी एक कोटी ९५ लाख रुपये २० फूट उंचीच्या ब्राँझच्या पुतळ्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. या ब्राँझच्या शिवसमर्थ स्मारकाचा पुतळा बनविण्याची वर्क आॅर्डर जेएनपीटीने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते देण्यात आली आहे. स्मारकाचे शिल्प बनविण्याचे काम पुण्याच्या चित्रकल्प आर्ट स्टुडिओ कंपनीला देण्यात आले आहे. शिव समर्थ स्मारकाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे.असे असेल शिवसमर्थ स्मारक --स्मारक उभारण्यासाठी २२ मीटर उंचीचे आणि १६०० स्क्वेअर मीटर क्षेत्रात हे बिल्डिंग स्ट्रक्चर उभारण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्यावर २० मीटर उंचीचा समर्थ रामदास स्वामी आणि शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. म्हणजे स्ट्रक्चरसह साधारणत: ९२.५ फूट उंचीवर शिवसमर्थ स्मारक बसविण्यात येणार आहे. इतक्या उंचीचे स्मारक परिसरातून कुठूनही दृृष्टीस पडणार आहे.-उरण तालुक्यातील दास्तान फाटा येथील जेएनपीटीच्या मालकीच्या दोन एकर जागेत हे स्मारक उभारण्यात येणार आहे. या शिव स्मारक क्षेत्रात आर्ट गॅलरी बनविण्यात येणार आहे. या आर्ट गॅलरीमध्ये शिवरायांच्या जीवनावरील विविध प्रसंगाची धातूची शिल्पे लावण्यात येणार आहेत. तसेच रायगडमधील थोर व्यक्तींची प्रासंगिक चित्रे आर्ट गॅलरीमध्ये लावली जाणार आहेत.-या आर्ट गॅलरीमध्ये शिवकालीन वस्तूंचे म्युझियमही साकारले जाणार आहे. तसेच सांस्कृतिक आणि विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यासाठी मिनी एमपी थिएटरही उभारण्यात येणार आहे. अद्ययावत कॅफेटेरिया बरोबरच दीड एकर क्षेत्रात फाउंटन आणि उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. सुमारे ३० कोटी खर्चाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढल्या वर्षी फेब्रुवारी २०१९मध्ये प्रत्यक्षात पूर्णत्वास जाणार आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज