शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार - अनंत गीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 06:54 IST

अलिबाग -  देशातील आणि राज्यातील राजकारण अस्थिर झालेले आहे. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुका कधीही झाल्या, तरी स्वबळावर लढून २५ खासदार आणि १५० आमदार हे शिवसेनेचे निवडून द्यायचे आहेत आणि त्यामध्ये रायगड जिल्ह्याचा वाटा मोठा असला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केले. अलिबाग-मुरु ड विधानसभा ...

अलिबाग -  देशातील आणि राज्यातील राजकारण अस्थिर झालेले आहे. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुका कधीही झाल्या, तरी स्वबळावर लढून २५ खासदार आणि १५० आमदार हे शिवसेनेचे निवडून द्यायचे आहेत आणि त्यामध्ये रायगड जिल्ह्याचा वाटा मोठा असला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केले. अलिबाग-मुरु ड विधानसभा क्षेत्रासाठी निर्धार मेळाव्याचे आयोजन अलिबाग येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी गीते बोलत होते. रायगड जिल्ह्याच्या सातही विधानसभा क्षेत्रामध्ये अशाच निर्धार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.२३ जानेवारी रोजी शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यानुसार आगामी सर्व निवडणुका स्वबळावरच लढणार असल्याचे गीते यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या भ्रष्ट कारभाराला हद्दपार करण्याची वेळ आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत माझ्या विरोधात त्यांना उमेदवारच सापडणार नाही. विधानसभेच्या सातही जागा काबीज करण्यासाठी रायगडातील जनतेने तयार राहावे, असेही आवाहन गीते यांनी केले.रायगड जिल्ह्यासह राज्यातील जनतेसाठी आणि औद्योगिकीकरणासाठी घेतलेल्या जमिनी सरकारकडे पडून आहेत. प्रकल्पासाठी जमिनी घेऊन त्या जमिनींवर एमआयडीसीचा शिक्का बसला, तो काढून टाकण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यात आगामी काळात बेरोजगारी दूर करण्यासाठी जिल्ह्यात रोजगार मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात आलेल्या बेरोजगारांना त्याच ठिकाणी नेमणुकीची पत्रे देण्यात येतील, अशी घोषणा सुभाष देसाई यांनी केली. अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाचा असणारा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचा उद्योग विभाग पुढाकार घेईल.उमटे धरणाच्या पाणी योजनेसाठी आवश्यक असणारे फिल्टरप्लांट उद्योग विभागामार्फत उभारण्यात येणार असल्याचे देसाई यांनी जाहीर केले.टोकरे येणार शिवसेनेतराष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे हे भाजपामध्ये जाणार अथवा शिवसेनेमध्ये, याची चर्चा गेले काही महिने सुरू आहे; परंतु टोकरे यांचा शिवसेना प्रवेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित लवकरच घेण्यात येईल, असे गीते यांनी स्पष्ट केल्याने टोकरेंच्या पक्षप्रवेशाबाबत सुरू असलेल्या उलट सुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

टॅग्स :Anant Geeteअनंत गीतेRaigadरायगड