शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-काँग्रेसची युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 06:42 IST

सुधागड तालुक्यात १४ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रणधुमाळीला रंग चढला आहे. सोमवारपासून नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी पाली तहसील कार्यालयात सर्वपक्षीय उमेदवारांची गर्दी दिसत आहे.

राबगाव/पाली - सुधागड तालुक्यात १४ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रणधुमाळीला रंग चढला आहे. सोमवारपासून नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी पाली तहसील कार्यालयात सर्वपक्षीय उमेदवारांची गर्दी दिसत आहे. पाली ग्रामपंचायत निवडणुकीवर सर्वपक्षीय बहिष्कार टाकणार अशी चर्चा सर्वत्र असताना त्यातून काँग्रेस पक्ष बाहेर पडला असून काँग्रेसचे सुधागड तालुकाध्यक्ष अनिरुद्ध (बाबा) कुलकर्णी व शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांची त्यांच्या कार्यालयात पाली ग्रामपंचायत निवडणुकीबाबत मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली.या बैठकीत पाली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना व काँग्रेस सर्व जागा युतीने लढविणार असा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देशमुख, पाली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन जवके, अविनाश शिंदे, संजूशेठ ओसवाल, संदेश सोनकर आदी उपस्थित होते.जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी सांगितले की, पाली ग्रामपंचायत निवडणुकीबाबत घेतलेला निर्णय हा प्रस्थापितांना हटविण्यासाठी आहे. त्यांनी ग्रामपंचायत त्यांच्याकडे असताना अनेक परवानग्या देताना पार्टी फंडाच्या नावाखाली लाखांची लूट केल्याचा आरोप देसाई यांनी केला. पाली नगरपंचायत ज्यांनी घालविली त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकून दुसऱ्यांना संधी द्यावी.काँग्रेसचे सुधागड तालुकाध्यक्ष कुलकर्णी म्हणाले की, पाली ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या बैठकीत मी अग्रस्थानी होतो पण त्यावेळी असे ठरले होते की निर्णयाविरोधात तत्काळ न्यायालयात जायचे त्याकरिता कमिटी देखील तयार करण्यात आली, परंतु ठरल्याप्रमाणे काही झाले नाही. आमची देखील फसवणूक केली. म्हणूनच आम्ही यांना धडा शिकविण्यासाठी आम्हाला समोर दिसणाºया शिवसेनेबरोबर युती करून पाली ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसgram panchayatग्राम पंचायत