शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते कामाच्या निकृष्ट दर्जावरून शिवसेना आक्रमक, अभियंत्याच्या चेहऱ्याला काळे फासले                                                                                                                                       

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 17:33 IST

लाखो रुपये खर्च करून भापट येथील नव्याने झालेला रस्ता हा निकृष्ट दर्जाचा व एक महिना देखील टिकू शकत नाही, असे शिर्के यांच्या निदर्शनास आले.

ठळक मुद्दे समाज माध्यमात आलेल्या वृत्ताची शहानिशा करण्यासाठी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी स्वतः भापट येथे जाऊन रस्त्याची पाहणी केली.

रायगड/म्हसळा - तालुक्यात रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचा होत असलेली कामे पाहून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी थेट बांधकाम अभियंता डोंगरे यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना गटविकास अधिकारी यांच्या कक्षात घडली. रस्ते विकास व मजबुतीकरण कामा अंतर्गत म्हसळा तालुक्यातील भापट या रस्त्याला सुमारे 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला होता, हा निधी खर्च करून या रस्त्याचे काम 3 जून रोजी पूर्ण झाले असून हा रास्ता 4 जून रोजी वाहून गेल्याचे वृत्त समाज माध्यमावर वाऱ्यासारखे फिरत होते.

समाज माध्यमात आलेल्या वृत्ताची शहानिशा करण्यासाठी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी स्वतः भापट येथे जाऊन रस्त्याची पाहणी केली. लाखो रुपये खर्च करून भापट येथील नव्याने झालेला रस्ता हा निकृष्ट दर्जाचा व एक महिना देखील टिकू शकत नाही, असे शिर्के यांच्या निदर्शनास आले. भापट येथील रस्ता पाहून झाल्यानंतर शिर्के निकृष्ट दर्जाचे रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी पंचायत समिती येथे गेले. पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यांच्या कक्षात जिल्हा परिषदेचे म्हसळा बांधकाम विभागातील अभियंता संजय डोंगरे हेदेखील उपस्थित होते. त्यावेळी रस्त्याबाबत अभियंता डोंगरे यांनी चुकीची माहिती देत असल्याचा रागातून शिवसेना माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी जनतेचा पैसा आहे हा, पैसाचा योग्य वापर करायला शिकून कामे चांगल्या दर्जाची करा असे सांगून अभियंता संजय डोंगरे यांचा तोंडाला काळे फासले. यावेळी त्यांचा सोबत शिवसेनेचे जेष्ठ नेते बाळ करडे, सुरेश कुडेकर, शिवसेना शहर प्रमुख अनिकेत पानसरे, दिपल शिर्के, वाहतूक सेनेचे शाम कांबळे, युवासेना तालुका अधिकारी अमित म्हामूनकर, अक्रम साने, राहुल जैन यांच्यासहित शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

टॅग्स :Raigadरायगडcorona virusकोरोना वायरस बातम्याroad transportरस्ते वाहतूकShiv Senaशिवसेना