शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीसीटीमधील शिपिंग लाइन्सची जहाजे गुजरातकडे; रोजगाराच्या संधी कमी होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 00:21 IST

भारतीय शिपिंगसाठीचे महत्त्वाचे ठिकाण असलेले जेएनपीसीटी बंदर गेली काही वर्षे भारतीय शिपिंग क्षेत्रातून लोप पावत आहे.

- मधुकर ठाकूर उरण : भारतीय शिपिंगसाठीचे महत्त्वाचे ठिकाण असलेले जेएनपीसीटी बंदर गेली काही वर्षे भारतीय शिपिंग क्षेत्रातून लोप पावत आहे. ही अधोगती बाजारपेठेतील परिस्थितीमुळे नसून गुजरातच्या बंदरांना सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सहकार्याचे हे परिणाम आहेत. जास्तीत-जास्त कार्गो (मालवाहतूक) ही जेएनपीटीकडून मुंद्रा या गुजरातेतील बंदरावर वळवण्यात आली आहे. २०१८ च्या १, २ आणि ३ नोटिफिकेशन्समधून परदेशी कंटेनर्सचा परवाना शिपिंग कंपन्यांतर्फे गुजरातमधून केला आहे.एमएससी मेडिटेरॅनियन शिपिंग आणि वर्षाकाठी सुमारे तीन लाख कंटेनर मालाची वाहतूक करणारी हुण्डाई कंपनीने यापूर्वीच मालवाहतूक सेवा जेएनपीसीटीकडून मुंद्रा आणि अन्य बंदरांंकडे वळवल्या आहेत. त्यामुळे दरमहा कोट्यवधींचे नुकसान जेएनपीटीला सहन करावे लागत आहे.गुजरातस्थित बंदरांवर सागरी वाहतूक वळवल्यामुळे जेएनपीटी परिसरातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नोकºयांवर गदा येण्याची शक्यता आहे. जेएनपीसीटीमध्ये नवीन रोजगार संधीही यापुढे उपलब्ध होणार नसल्याची खंत कामगार आणि काही शिपिंग कंपन्यांंच्या अधिकाºयांकडून व्यक्त होत आहे.अदानी बंदरांच्या उदयामुळे (मुंद्रा, हाजिरा आणि दहेज) जेएनपीसीटीचे महत्त्व कमी होत चालले आहे. या उलट, गुजरातस्थित बंदरांवर रोजगार संधी मोठ्या प्रमाणात खुल्या झाल्या असून सहायक सरकारी धोरणांमुळे हे घडत आहे. गेल्या काही वर्षांत मोठे उद्योगधंदे गुजरातमध्ये गेले असल्याचाही हा परिणाम आहे. भारतातील परदेशी कंपन्यांसाठी अंतर्गत नेव्हिगेशन उघडण्याच्या शिपिंग धोरणात अलीकडेच झालेल्या बदलांनी या वाढत्या ट्रेण्डला आणखी पाठबळ मिळाले. यामुळेच जेएनपीटी बंदरावर गंडांतर येऊ लागल्याचा आरोपही शिपिंग कंपन्यांंच्या अधिकाºयांकडून होत आहे.गुजरातमधील अदानी बंदराला झुकते माप दिल्यामुळे, तेथील व्यवसाय वाढला असून महाराष्ट्रातील व्यवसाय ठप्प होत आहे. परिणामी रोजगार निर्मितीही गुजरातमध्ये होत आहे. महाराष्ट्र राज्य सागरी हद्दीतले महत्त्वाचे केंद्र आहे. कोकणातील तरुण गेली कित्येक पिढ्या सागरी व्यापारी नौकांवर कार्यरत असल्याची प्रतिक्रिया एका स्थानिक नेत्याने यावेळी दिली. भारतीय शिपिंग कंपन्यांसाठी मालवाहनाच्या धोरणांत घट करण्यात आली आहे. मात्र अदानी आणि गुजरातच्या पथ्यावर पडेल, अशीच धोरणे नव्याने आखण्यात येत असल्याची माहिती शिपिंग उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. काही शिपिंग कंपन्यांंनी कंटेनर वाहतूक जेएनपीसीटी बंदरातून जेएनपीटीअंतर्गत असलेल्या इतर खासगी बंदरांकडे वळवली असली तरी रॉयल्टीतून मिळणाºया उत्पादनाचा फायदा जेएनपीटीलाच होणार आहे.जेएनपीटीने डिसेंबर २०१८ मध्ये ४.४५ लाख टीईयूएस इतक्या कंटेनर मालाची हाताळणी केली आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदराचा व्यवसाय कमी झाला नसून वाढतच चालला असल्याचा दावा जेएनपीटीने केला आहे. मात्र कंटेनर हाताळणीच्या विलंबामुळे जेएनपीसीटीच्या अनेक शिपिंग लाइन्सची जहाजे गुजरातकडे वळू लागल्याच्या प्रश्नावर जेएनपीटीकडून मौन पाळले आहे. जेएनपीसीटी सोडून काही शिपिंग कंपन्यांंची मालवाहू जहाजे जेएनपीटीअंतर्गत असलेल्या खासगी बंदरांकडे जाण्याने जेएनपीटीला रॉयल्टी मिळत असली तरी त्यामुळे कामगारांचे काम कमी होऊ लागले आहे. त्यामुळे कामगारांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप जेएनपीटी कामगारांकडून केला जात आहे.

टॅग्स :JNPTजेएनपीटीGujaratगुजरात