शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

रायगडच्या समुद्रात चमकणाऱ्या निळ्या रंगाच्या लाटा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 02:23 IST

Raigad News : सिंधुदुर्ग, रत्नागिरीपाठोपाठ आता रायगडच्या समुद्रकिनारीदेखील रात्री चमकणाऱ्या निळ्या रंगाच्या लाटांचा नजारा सध्या अनुभवण्यास मिळत आहे.

- निखिल म्हात्रे अलिबाग :  सिंधुदुर्ग, रत्नागिरीपाठोपाठ आता रायगडच्या समुद्रकिनारीदेखील रात्री चमकणाऱ्या निळ्या रंगाच्या लाटांचा नजारा सध्या अनुभवण्यास मिळत आहे. हा नजारा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक रात्रीच्या वळेस गर्दी करीत आहेत. बुधवारी रात्री नागाव सुमद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारायला गेलेल्या तरुणांनी या निळ्या रंगाच्या लाटा पाहिल्या आणि आपल्या मोबाइलमध्ये कैद केल्या. मात्र, मत्स विभागाला याबाबत अद्याप काही माहिती नसल्याचे समोर येत आहे.सायंकाळी काळोख पडल्यानंतर या निळ्या रंगाचा प्रकाश दिसायला लागतो. हळूहळू तो अधिक चमकदार होतो. रात्री अंधारात लाटांबरोबर हेलकावे खाणारा हा निळा प्रकाश डोळ्यांत साठविणे हा एक विलोभनीय अनुभव आहे. समुद्राचे पाणी हातात घेऊन ढवळले तरी हा निळा चमचमता प्रकाश पाहायला मिळतो. रायगड जिल्ह्यात प्रथमच असा प्रकाश अचानक समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या किनारपट्टीवर असा अद्भुत नजारा पाहायला मिळाला होता. सध्या नागावच्या समुद्र किनाऱ्यावर असा अद्भुत नजारा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र असे काही असल्याची माहिती आमच्याकडे नाही, किंवा तशी माहिती स्थानिक मच्छीमार सोसायट्यांकडून अद्याप आम्हाला मिळाली नसल्याचे मत्स व्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले  आहे.बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लगलेट्स या सूक्ष्म जीवांच्या निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे लाटा चकाकत आहेत, असा अभ्यासकांचा दावा आहे. तसेच समुद्रात या जिलेट्स सूक्ष्म जीवांची जास्त वाढ होण्यामुळे माशांवर विपरीत परिणाम होत असल्याचेही मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. सगळे मित्र रात्री ८ च्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर गेलो होतो. त्या वेळी लाटांबरोबर निळ्या रंगाचा चमचमता प्रकाश दिसला. हा विलक्षण अनुभव आम्ही पहिल्यांदाच घेतला. आमच्या मोबाइलमध्ये त्याचे छायाचित्र कैदही केले. तसेच ही सारी घटना ग्रामपंचायत प्रशासनालाही सांगितली.- आकाश चंदनशिवे, प्रत्यक्षदर्शी

टॅग्स :Natureनिसर्गRaigadरायगड