शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठात पालीतील प्रकल्पाची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 00:55 IST

महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्रा. अंजली सुधीर पुराणिक यांनी सादर केलेला ‘ए ग्रीन अ‍ॅप्रोच टू क्लिन इंडस्ट्रियल एमिशन्स’ हा संशोधन प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरला आहे.

- जयंत धुळपअलिबाग : गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठात आयोजित १३ व्या अविष्कार आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात पाली येथील जे. एन. पालीवाला महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्रा. अंजली सुधीर पुराणिक यांनी सादर केलेला ‘ए ग्रीन अ‍ॅप्रोच टू क्लिन इंडस्ट्रियल एमिशन्स’ हा संशोधन प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरला आहे. याशिवाय आठ सुवर्ण आणि पाच रौप्य पदकांसह मुंबई विद्यापीठाच्या महोत्सवातही प्रकल्पाने बाजी मारली आहे.औद्योगिक प्रदूषणामध्ये धूलिकण, हरितवायू, आम्ल गुणधर्म असलेले वायू यांचा समावेश होतो. बहुतेक सर्व कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या वायूंमधून धूलिकण बाजूला केले जातात; परंतू हरितवायू व आम्ल वायू मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडले जातात, यामुळे वैश्विक तापमानवाढीला हातभार लागतो. हे घातक वायू त्यांच्या उगमस्थानीच थांबविण्यासाठी पुराणिक यांनी ‘ए ग्रीन अ‍ॅप्रोच टू क्लिन इंडस्ट्रियल एमिशन्स’ या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. यामध्ये एक नावीन्यपूर्ण मिश्रण तयार करण्यात आले असून, शोषण (अ‍ॅडसॉर्पश) प्रक्रियेच्या मदतीने वायुप्रदूषण थांबविण्यात प्रकल्प यशस्वी झाला असल्याची माहिती प्रा. अंजली पुराणिक यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे, संशोधनाची आवड निर्माण करणे, भविष्याला पूरक ठरू शकणारे संशोधन करणाºया विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रोत्साहित करणे, २००७-०८ मध्ये महाराष्टÑाचे तत्कालीन राज्यपाल एस.एम. कृष्णा यांच्या संकल्पनेतून ‘अविष्कार’ हा संशोधन महोत्सव सुरू करण्यात आला. संशोधनात गुरू के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या डॉ. भानू रामन यांचे मार्गदर्शन, मुंबई विद्यापीठाच्या अविष्कारचे विशेष कार्य अधिकारी डॉ. एस. एम. बर्वे, डॉ. एम. एन. मोमिन व डॉ. मीनाक्षी गुरव यांचे मार्गदर्शन, प्राचार्य युवराज महाजन व वसंत ओसवाल यांचे प्रोत्साहन लाभल्याचे पुराणिक यांनी सांगितले.>२० विद्यापीठांतील ५८० स्पर्धक सहभागीमहोत्सवात मानव्यशास्त्र, भाषा, कला, वाणिज्य, व्यवस्थापन, कायदा, मूलभूत विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यकीय व औषध निर्माण या दहा शाखांमधून विद्यापीठीय शिक्षणातील विविध पातळीवरील विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी होत असतात. प्रत्येक विद्यापीठाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत ४८ जणांचा संघ सहभागी होतो. प्रत्येक शाखांतील चार वेगवेगळ्या गटांमधून प्रथम येणाºया दोन स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व रोख पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा महोत्सवात राज्यातील २० विद्यापीठातील, ५८० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी १४१ विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्रकल्प सादर केले, तर ४३९ स्पर्धकांनी पोस्टर्स सादर केले.