शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार मारहाण प्रकरणात शेकाप सरचिटणीस जयंत पाटील दोषी; ५ हजार  नुकसान भरपाई  देण्याचेही कोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:09 IST

शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांना अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. बी. अत्तार यांनी दोषी ठरवले. एक वर्ष  चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र आणि पाच हजारांची नुकसान भरपाई  देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

अलिबाग : अलिबाग येथील पत्रकार  हर्षद कशाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांना अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. बी. अत्तार यांनी दोषी ठरवले. एक वर्ष  चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र आणि पाच हजारांची नुकसान भरपाई  देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मतमोजणी सुरू असताना जिल्हा क्रीडासंकुलातील मतमोजणी केंद्रात घुसून पाटील यांनी कशाळकर यांना मारहाण केली.  याप्रकरणी २४ मे २०१९ रोजी  जयंत पाटील, पंडित ऊर्फ सुभाष पाटील आणि अभिजीत कडवे यांच्यावर अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अलिबाग पोलिस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी या प्रकरणाचा तपास करून अलिबाग येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांच्या न्यायालयात सुरू होती. सुनावणीदरम्यान एकूण १३ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यात फिर्यादी, अंमलदार, पंच आणि साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Jayant Patil Guilty in Journalist Assault Case; Fine Imposed

Web Summary : Jayant Patil, Shekap General Secretary, convicted for assaulting journalist Harshad Kashalkar during the 2019 election. Court ordered a good behavior bond and ₹5,000 compensation. The Alibag police investigated, filing charges after the incident at the counting center.
टॅग्स :Courtन्यायालय