शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये ४००० हेक्टर भातपिकाची धूळधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 03:00 IST

चक्रिवादळाचा धोका दूर होताच, पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली.

पेण : चक्रिवादळाचा धोका दूर होताच, पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मेघगर्जनेसह आलेल्या परतीच्या पावसाने शिवारात पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे कापलेली भाताची कडपे लोंब्यांसह पाण्यात भिजल्याने भाताचा दाणा फुगून त्याला कोंब येण्याची प्रक्रिया सुरू झाली. शुक्रवारीही पावसाने सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. त्याच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.तालुका कृषी विभागाने तातडीने शेताच्या बांधावर धाव घेत बाधित शेतीचे पंचनामे सुरू केले आहेत. पेण तालुक्यातील एकूण भात लागवड केलेल्या १२ हजार ४०० हेक्टर क्षेत्रांपैकी ४० टक्के क्षेत्र अंदाजे ४००० हेक्टरवरील पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, आतापर्यंत २२५० हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी ए. आर. रोकडे यांनी स्पष्ट केले.यंदा पाऊस चांगला झाल्याने खरिपातील पीकही चांगले आले होते. मात्र, परतीच्या पावसाने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकाची नासाडी केली. गेले दोन दिवस सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस कोसळत असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.तहसील कार्यालयाने शेती नुकसानाच्या पंचनाम्याच्या सूचना केल्यावर, तालुका कृषी अधिकाºयांनी तातडीने कामास सुरुवात केली आहे.>शेतकरी आर्थिक संकटातपेणच्या एकूण लागवड झालेल्या १२ हजार ४०० हेक्टरपैकी निम्म्या क्षेत्रात खारेपाटातील शेती समाविष्ट आहे. यापूर्वी झालेली चक्रिवादळात उभे पीक भुईसपाट झाले होते. त्यावर आता दोन दिवस वादळी पावसाने कापणी केलेली शेती, उडवी व कापायची राहिलेली शेती असे अंदाजे ४००० हेक्टर क्षेत्रावर परतीच्या पावसाने कहर माजवला आहे. या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिसरातील नुकसानाचा आकडा मोठा असून, पंचनामे थेट शेताच्या बांधावर जाऊन कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडून शासकीय कृषी विभागाकडून करण्यात येत आहेत.