शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

वाशिम जिल्ह्यात सोशल मीडियात अफवांचे शेअरिंग

By admin | Updated: July 28, 2014 01:52 IST

व्हॉट्स अँपवर ईलता वाढली: अफवा ठरताहेत सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी.

नागेश घोपे / वाशिम परस्परांशी अगदी सहज अँक्सेस होणार्‍या व्हॉट्स अँपने सद्य:स्थितीत तरुणाईला भुरळ घातले आहे. मात्र, एकमेकांशी संवाद साधण्यापेक्षा यावर अफवांच्या शेअरिंगलाच कमालीचा ऊत आला आहे. परिणामी डोकेदुखी वाढली आहे.अँड्राईड मोबाईल फोनमुळे आजमितीला सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. फेसबुकची क्रेझ काहीशी कमी होते ना होते तोच व्हॉट्स अँपने तरुणाईला कवेत घेतले आहे. संवादाच्या या नव्या तंत्राचा अनेकांना मोठा फायदा होत असला तरी, सध्या वाट चुकलेल्या काही वापरकर्त्यांनी या जादूच्या कांडीचा वापर चुकीच्या कामांसाठी चालविला आहे. योग्य प्रसंगावधान साधून एखादी अफवा व्हॉट्स अँपवर शेअर केली जाते. अल्पावधीतच या अफवांचा वायुवेगाने प्रसार होतो आणि नंतर सुरू होते ती सामान्यांची त्रेधातिरपीट. सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या अपघाताची अफवा असो अथवा या दोन दिवसातच व्हॉट्स अँपवर झळकलेल्या नारायण राणे यांच्या मनसे प्रवेशाच्या वार्तेने सर्व लोकांचे डोके चक्रावून टाकले होते, हे निश्‍चित. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तर परस्परांविरोधात लढणार्‍यांच्या पाठिंब्याच्या सोशल मीडियावरील अफवांनी चांगलाच रंग आणला होता.*पालकांनो जागरूक व्हा !व्हॉट्स अँप व फेसबुक या सोशल मीडियातील अप्लिकेशनचा वापर मुलेच करतात असे नाही. मुलीही ही अप्लिकेशन हाताळत आहेत. त्यांचेही ग्रुप आहेत; पण या ग्रुपमध्ये नेमक ी कशाची देवाण-घेवाण केली जाते, हे पाहिले असता त्याही मुलांपेक्षा वेगळे काही करीत नाहीत हेच दिसून आले. त्यामुळे आता पालकांनी जागृत होण्याची वेळ आली आहे. आपला मुलगा अथवा मुलगी हातातील मोबाईल सोडतच नसेल, तर पालकांनी त्यांची चौकशी करावी तरच याला आळा बसेल.*सावधानता बाळगणे गरजेचेफेसबुकचा वापर करताना युर्जसने दक्षता घेणे गरजेचे आहे. फेसबुक वापरताना कुणालाच आपला पासवर्ड तथा अन्य खासगी माहिती देऊ नये. एवढेच नव्हे तर पासवर्ड हा अत्यंत क्लिष्ट ठेवावा जेणेकरून सहज कुणालाही तुमचे अकाऊंट वापरणे शक्य होणार नाही. व्हॉट्स अँप वापरताना आपल्याला आलेला प्रत्येक संदेश दुसर्‍यांना पोस्ट करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या. कुणी अफवा पसरवित असेल, तर त्याला दाद देऊ नका म्हणजे या कृत्याला पायबंद घातल्या जाईल.