शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांचा ११ मार्चला रोह्यात सत्कार, सुनील तटकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 07:01 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार येत्या रविवारी ११ मार्च रोजी रोह्याच्या दौºयावर येत आहेत. लोकसभा, राज्यसभा, महाराष्ट्र विधानसभा, विधानपरिषद अशा सर्व सभागृहात महाराष्ट्राचे समर्थ प्रतिनिधित्व केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा भव्य सत्कार रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

रोहा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार येत्या रविवारी ११ मार्च रोजी रोह्याच्या दौºयावर येत आहेत. लोकसभा, राज्यसभा, महाराष्ट्र विधानसभा, विधानपरिषद अशा सर्व सभागृहात महाराष्ट्राचे समर्थ प्रतिनिधित्व केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा भव्य सत्कार रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी रोहा येथे पत्रकार परिषदेत दिली.यावेळी आमदार सुनील तटकरे, तालुका अध्यक्ष मधुकर पाटील, अनिकेत तटकरे, शहर अध्यक्ष अमित उकडे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, गटनेते महेंद्र दिवेकर, माणगाव नगराध्यक्ष आनंद यादव आदी उपस्थित होते. रोहा शहराजवळील म्हाडा मैदानावर रविवारी ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता हा सत्कार सोहळा होणार असून या सोहळ्याला सुमारे तीस ते पस्तीस हजार कार्यकर्ते उपस्थित रहातील. जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, तालुका अध्यक्ष मधुकर पाटील व अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाची पूर्वतयारी चालू असल्याचे आमदार सुनील तटकरेंनी यावेळी सांगितले.रोहा औद्योगिक वसाहतीतील नुकत्याच घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हवा व पाणी प्रदूषण, अपघात, असुरक्षिततेचे वातावरण व रोजगारासंबंधी प्रश्न यावर सभागृहात चर्चा घडवून आणणार असून शासनाला निर्णायक भूमिकेवर घेण्यास भाग पाडणार असल्याचे स्पष्ट केले. रोह्याच्या कार्यक्र माच्या निमित्ताने जिल्ह्यातील ताकदीचे एकत्रीकरण होणार असून २ एप्रिलपासून कागल येथून पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाला प्रारंभ होईल व मे महिन्यात कोकणात सिंधुदुर्ग ते पालघर हल्लाबोल आंदोलन होणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. हल्लाबोल आंदोलनातील प्रश्नांवर शासन निर्णायक भूमिका घेत नाही तोपर्यंत ते चालूच राहील असेही तटकरेंनी स्पष्ट केले.आगामी निवडणुकीत धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र ठेवण्याचा आमचा प्रयत्न असून जिल्ह्यात शेकापबरोबर आमची आधीच आघाडी आहे. राज्यात काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू असल्याचे तटकरेंनी सांगितले. माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केलेली टीका ही वैयक्तिक व नैराश्येच्या भरात केलेली असून २८८ मतदारसंघांना समोर ठेवून आघाडी होणार असल्याने त्याबाबत त्यांचे नेते योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा आमदार सुनील तटकरेंनी व्यक्त केली. शरद पवारांच्या दौºयात रायगड लोकसभा वा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर होणार का या प्रश्नांवर आम्ही गुडघ्याला बाशिंग बांधलेले नाही, योग्य वेळी शरद पवार उमेदवारी जाहीर करतील असे सावध उत्तर तटकरेंनी दिले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaigadरायगड