शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर : किना-यावरील फुटलेल्या संरक्षक बंधा-यांच्या दुरुस्तीचे काम दुस-या दिवशीही सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 15:51 IST

शुक्रवारी सूर्य उगवला आणि शहापूर-धेरंडमधील प्रत्येक घरातील एक स्त्री वा पुरुष शेतकरी आपल्या घरचे फावडे, कुदळ, घमेले आणि दुपारच्या जेवणासाठी भाजी-भाकरी सोबत घेऊन गावांच्या किनारी भागातील फुटलेल्या संरक्षक बंधा-यांच्या दुरुस्तीकरीता श्रमदान करण्याकरीता निघाला होता.

जयंत धुळप/शहापूर - शहापूर-धेरंड येथे शुक्रवारी (9 फेब्रुवारी) सकाळी  प्रत्येक घरातील एक स्त्री वा पुरुष शेतकरी आपल्या घरचे फावडे, कुदळ, घमेले आणि दुपारच्या जेवणासाठी भाजी-भाकरी सोबत घेऊन गावांच्या किनारी भागातील फुटलेल्या संरक्षक बंधा-यांच्या दुरुस्तीकरीता श्रमदान करण्याकरीता निघाला होता. श्रमदान करण्यासाठी निघालेला हा प्रत्येक जण गुरुवारी केलेल्या दिवसभराच्या श्रमदानाने खरतर पूर्णपणे थकून गेला होता परंतू आपल्याच गावाच्या आणि आपल्याच कुटुंबाच्या बचावासाठी दुस-या दिवशी देखील न थकता श्रमदान करणे अपरिहार्य असल्याने कुणाच्याही कपाळावर तक्रारीची आठी नव्हती.

बंधा-यांची दुरुस्ती केली नाही तर पुन्हा समुद्राचे पाणी थेट गावात समुद्र संरक्षक बंधा-यांची कामे रोजगार हमी योजनेतून घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे. परंतु गावांतील सर्व शेतक-यांची जॉबकार्ड तयार नसल्याने, कामास शासकीय मंजुरी मिळण्याची प्रक्रिया झालेली नसल्याने, प्रत्यक्ष रोजगार हमी योजनेतून कामे सुरू होण्यास अद्याप काही कालावधी लागणार आहे. मात्र येत्या गुरुवारी 15 फेब्रुवारी रोजी असलेल्या अमावास्येपूर्वी सद्यस्थितीत फुटलेल्या संरक्षक बंधा-यांची दुरुस्ती (खांडी बुजविणो)केली नाही तर पुन्हा गुरुवारी अमावास्येच्या उधाणाला समुद्राचे पाणी भातशेती पार करुन थेट गावांत आणि घरात घूसण्याची दाट शक्यता असल्याने हे सारे 250 स्त्री-पुरुष शेतकरी ग्रामस्थ गुरुवारपासून श्रमदान करुन फूटलेले संरक्षक बंधारे दगड-चिखलमाती घालून बुजवण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत.