शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जयंत धुळप यांना ‘सावली गौरव’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 02:11 IST

सावली सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘सावली गौरव’ पुरस्कार ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक जयंत धुळप यांना ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

अलिबाग : सावली सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘सावली गौरव’ पुरस्कार ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक जयंत धुळप यांना ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.बदलापूर येथील मोरे मंगल कार्यालयात रविवारी आयोजित कार्यक्रमात बदलापूर महापालिकेचे आरोग्य सभापती श्रीधर पाटील, अ‍ॅड. अण्णासाहेब सावंत महाड को-आॅप अर्बन बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत, ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर दाभाडकर, शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.विनोद देशमुख, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, साहित्यआभाच्या संपादिका शारदा धुळप, अभिनेत्री मृणाल चेंबूरकर, सावलीचे संस्थापक अध्यक्ष गणराज जैन, डॉ. अर्चना जैन, डॉ.अजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.काळानुरूप बदलत गेलेल्या पत्रकारितेचा लेखाजोखा यावेळी चंद्रशेखर कुलकर्णी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात मांडला. पत्रकारिता करताना आपण करीत असलेल्या कामावर निष्ठा असणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.प्रास्ताविकात सावली सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणराज जैन यांनी संस्थेच्या स्थापनेची माहिती देऊन आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर दाभाडकर यांनी जयंत धुळप यांच्या पत्रकारितेतील विविध बातम्या आणि प्रसंगांचा आढावा घेत मनोगत व्यक्त केले आणि धुळप यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले. साहित्यआभाच्या संपादिका शारदा धुळप आणि जयंत धुळप यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात बदलापूर येथे सफर प्राणी सुश्रुषा केंद्राकरिता जागा उपलब्ध करून देणारे म्हात्रे कुटुंबीय, गिनीज बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली बदलापूरची स्केटिंगबेबी निष्का यादव आणि अभिनेत्री मृणाल चेंबूरकर यांचा शानदार सत्कार करण्यात आला. गौरव सोहळ््यानंतर ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, भरत दौंडकर,तुकाराम धांडे आणि प्रा.प्रशांत मोरे यांच्या ‘रंग कवितेचे’ या सुरेख काव्य मैफलीचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. प्रारंभी सावली सामाजिक संस्थेच्या कार्याचा परिचय करून देणारी गोविंद पारकर आणि पवित्र श्रीवास्तव यांनी तयार केलेली डॉक्युमेंटरी उपस्थितांसमोर सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता गोविंद पारकर, पवित्र श्रीवास्तव, श्वेता कोहोजकर, श्याम माळी, संदेश भोईर, आशिष गडगे, अंकिता देसाई, मंजुळा निरगुडा आदींनी परिश्रम घेतले.