शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

सेझची जमीन आता इतर उद्योगांनाही खुली, सिडको संचालक मंडळाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 06:51 IST

उरण परिसरातील नवी मुंबई सेझ प्रकल्पाच्या जमिनीवर आता कोणतेही उद्योग सुरू करता येणार आहेत. विशेष आर्थिक क्षेत्रासाठी घालून दिलेली निर्यात उद्योगाची अट सिडकोने शिथिल केली आहे.

- कमलाकर कांबळे नवी मुंबई - उरण परिसरातील नवी मुंबई सेझ प्रकल्पाच्या जमिनीवर आता कोणतेही उद्योग सुरू करता येणार आहेत. विशेष आर्थिक क्षेत्रासाठी घालून दिलेली निर्यात उद्योगाची अट सिडकोने शिथिल केली आहे. त्यामुळे या जमिनीवर आता कोणतेही उद्योग सुरू करता येणार आहेत. तशा आशयाचा प्रस्ताव सिडकोच्या संचालक मंडळाने मंजूर केला असून, तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे मागील १२ वर्षांपासून वापराविना पडून असलेल्या २१५० हेक्टर जमिनीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.सिडकोच्या नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्राला (एनएमएसईझेड) २००४ मध्ये मंजुरी मिळाली. विशेष आर्थिक क्षेत्र निर्माण करण्यासाठी त्या वेळी मागविलेल्या निविदेनंतर सदर काम द्रोणागिरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले. या कंपनीमध्ये निखिल गांधी, आनंद जैन व मुकेश अंबानी यांची भागीदारी आहे. या नवी मुंबई सेझमध्ये द्रोणागिरी इन्फ्रास्ट्रक्चरचे ७४ टक्के, तर सिडकोचे जमिनीच्या स्वरूपात २६ टक्के समभाग आहेत. द्रोणागिरी इन्फ्रास्ट्रक्चरला सेझ निर्माण करण्यासाठी देण्यात आलेली २१५० हेक्टर जमीन ही द्रोणागिरी १ व २, उलवे व कळंबोली आदी चार पॉकेटमध्ये विभागून देण्यात आली होती. संबंधित कंपनी व सिडको दरम्यान त्या अनुषंगाने लिज, शेअर होल्डर व डेव्हलपमेंट आदी तीन प्रकारचे करारनामे झाल्यानंतर संबंधित कंपनीने द्रोणागिरी व उलवे येथील जमिनीला कंपाउंड वॉल बांधून टाकले. २००६ पासून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते. शासनाने सप्टेंबर २०१२ पर्यंत मुदतवाढ देऊनही हा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला नाही. विशेष म्हणजे, २०१२पासून ते आजतागायत म्हणजेच मागील पाच वर्षांत या प्रकल्पाबाबत सिडको व एनएमएसईझेड यांच्यात कुठलाच संवाद झाला नाही. त्यामुळे हा प्रकल्प अडगळीत पडला. त्यामुळे शासनाने २०१३ मध्ये नवीन औद्योगिक धोरण तयार करून राज्यातील जे सेझ कार्यरत होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी इंटिग्रेटेड इंडस्ट्रीयल एरीया (आयआयए)मध्ये रूपांतरित करण्याचे ठरले. असे करताना पूर्वीच्या ५०-५० टक्के सेझ धोरणाऐवजी आयआयएमध्ये १० टक्के अधिक इंडस्ट्री वाढवण्याची बंधने टाकण्यात आली. मात्र, हे आयआयए धोरण सिडको एनएमएसईझेडसाठी लागू नसल्याचे शासनाकडून स्पष्ट केले.नवी मुंबई सेझ संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मुख्य सचिवांकडे वारंवार बैठका झाल्यानंतर यावर राज्याच्या महाधिवक्ता यांचे अभिप्राय घेण्याचे ठरले. त्याअनुषंगाने द्रोणागिरी इन्फ्रास्ट्रक्चरची आयआयएची मागणी कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का, पब्लिक बिडिंग झाले असल्याने आयआयएमध्ये रूपांतरित करता येईल का? सदर प्रकल्पाची प्रोजेक्ट कॉस्ट व निर्माण झालेल्या कायदेशीर अडचणी या सर्व बाबींवर विचार करून अखेरीस राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल कुंभकोणी यांनी नवी मुंबई सेझची जमीन निर्यात उद्योगांसह सर्व प्रकारच्या उद्योगांना खुली करण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय दिला. त्या अनुषंगाने सिडकोने गेल्या शुक्रवारी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करून तो अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे १२ वर्षांपासून पडून असलेल्या जमिनीवर सेवा-उद्योगांसह लॉजिस्टिक इंडस्ट्रीसाठी वापर करता येणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई