शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

महाडमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अल्पवयीन मुलीला ढकलले वेश्या व्यवसायात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 16:26 IST

महाड शहरात गेल्या दोन अडीच महिन्यांपासून सुरू असलेले एक सेक्स रॅकेट महाड शहर पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहेत.

महाड : महाड शहरात गेल्या दोन अडीच महिन्यांपासून सुरू असलेले एक सेक्स रॅकेट महाड शहर पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहेत. या प्रकरणी एक महिला आणि एका पुरुष दलालासह अन्य चार जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे, तर एक जण फरार असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. 17 वर्षं वयाच्या एका अल्पवयीन मुलीला या सर्वांनी मिळून जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलले होते. पीडित मुलीच्या फिर्यादीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये शहरातील काही व्यावसायिकांचा समावेश असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती बळीराम धुमाळ ( वय, ३४, रा. करंजखोल, महाड ) या महिलेने या अल्पवयीन मुलीच्या गरीब परिस्थितीचा आणि असाहय्यतेचा फायदा घेत तिला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. तिच्याकडे काही ग्राहक पाठविले. त्यानंतर स्वाती धुमाळ हिने तिल प्रवीण यशवंत निकम ( वय ५५, रा. करंजखोल )  या दुसऱ्या दलालाच्या स्वाधीन केले. प्रवीण निकम याने प्रथम तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर ग्राहकांकडून कमिशन घेऊन या मुलीला त्यांच्याबरोबर शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले.या सर्वांनी जिजामाता उद्यानाजवळील इमारत, गवळ आळी, प्रभात कॉलनी, काकरतळे, मांडले गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एक फार्म हाऊस या ठिकाणी या मुलीला नेऊन या मुलीवर अत्याचार केले. हा सर्व प्रकार या मुलीच्या आईला समजल्यानंतर, तिने सोमवारी ( १५ ऑक्टोबर ) मुलीसह महाड शहर पोलीस ठाणे गाठले आणि पीडित मुलीला फिर्याद द्यायला लावली. या फिर्यादीत या मुलीने स्वाती धुमाळ, प्रवीण निकम यांच्यासह अजय उर्फ अजित रामचंद्र पवार (वय २५ रा. आदर्श नगर, महाड ) श्रवण भैरवसिंह राजपूत उर्फ चट्ठाना (वय २२ रा. जुना पोस्ट, महाड ),उमेश मोतीराम सावरे (वय २५ रा. नवेनगर, महाड),रणजित रमेश नातेकर (वय ३७, प्रभात कॉलनी, महाड ) आणि निलेश शिंदे ( महाड ), यांच्याविरुद्ध भा.दं. वि. कलम ३७०, ३७६ (२ ), (जे ), ( एन ), ३५४ (अ ), ३४ सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा ( पोस्को ) कलम ४ आणि ८ आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम ४ आणि ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.या आरोपींपैकी सौ. स्वाती बळीराम धुमाळ,प्रवीण यशवंत निकम, अजय उर्फ अजित रामचंद्र पवार, श्रवण भैरवसिंह राजपूत उर्फ चट्ठाना,उमेश मोतीराम सावरे, रणजित रमेश नातेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. निलेश शिंदे हा आरोपी अद्याप सापडला नसून, त्याचा शोध सुरु आहे. महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शैलेश सणस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.