शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रायगड प्रदक्षिणेत ७०० साहसवीर, चार वर्षांच्या मुलीसह ७० वर्षांच्या आजोबांनी घेतला सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 04:56 IST

रायगड जिल्हा परिषद आणि युथ क्लब, महाडच्या विद्यमाने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रायगड प्रदक्षिणेला राज्यभरातील शिवप्रेमी आणि साहसवीरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महाड : रायगड जिल्हा परिषद आणि युथ क्लब, महाडच्या विद्यमाने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रायगड प्रदक्षिणेला राज्यभरातील शिवप्रेमी आणि साहसवीरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ७०० प्रदक्षिणार्थींमध्ये चार वर्षांच्या मुलीसह ७० वर्षांच्या आजोबांपर्यंतच्या आबालवृद्धांनीही सहभाग घेतला.सकाळी ६.३० वाजता प्रदक्षिणार्थींचा पहिला चमू पाचाड येथून रवाना करण्यात आला. ७० ते ८० प्रदक्षिणार्थींचा एक चमू असे आठ चमू दर १५ मिनिटांच्या अंतराने सोडण्यात आले. डॉ. दिगंबर गीते यांनी केवळ दोन तासांमध्ये १७ किलोमीटरची अवघड प्रदक्षिणा पूर्ण केली. अनेक प्रदक्षिणार्थींनी साडेतीन ते चार तासांमध्ये हे अंतर पार केले.रायगड प्रदक्षिणा मार्गावर अवघड चढ-उतार, चिंचोळ्या खिंडी, नदी-नाले यांचे आव्हान त्याचप्रमाणे रायगडचे भव्य रूप आणि निसर्ग या दरम्यान प्रक्षिणार्थींनी अनुभवला. या वेळी प्रदक्षिणार्थींना रायगड खोऱ्यातील वृक्षसंपदेची माहिती व्हावी, या उद्देशाने अनेक झाडांवर त्यांची स्थानिक नावे, शास्त्रीय नावे दर्शविणारे फलक लावले होते.सकाळी ९ वाजता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी या प्रदक्षिणेत काही अंतरापर्यंत सहभाग घेऊन प्रदक्षिणार्थींचा हुरूप वाढविला.

टॅग्स :Raigadरायगड