शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महाड दुर्घटनेत सात कामगार ठार, चौघांचा शोध अद्याप सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 09:10 IST

ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीतील सर्व कामगारांच्या मृतदेहांची ओळख पटविणे शक्य नसल्याने, ते पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेले असून, तेथे डीएनए तपासणीनंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येतील, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली. 

- सिकंदर अनवारे

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील औषधनिर्मिती कारखान्याला शुक्रवारी भीषण स्फोट झाला होता. त्यामुळे कारखान्याला आग लागून ११ कामगार बेपत्ता होते. त्यातील सात जणांचे मृतदेह शनिवारी सापडले. इतर चौघांचा शोध अद्याप सुरू आहे. ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीतील सर्व कामगारांच्या मृतदेहांची ओळख पटविणे शक्य नसल्याने, ते पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेले असून, तेथे डीएनए तपासणीनंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येतील, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. मदतकार्यास वेग आणण्याकरिता प्रशासनाला सूचना दिल्या. यावेळी त्यांनी अडकलेल्या कामगारांच्या नातेवाइकांची आणि जमा झालेल्या ग्रामस्थांचीही भेट घेऊन त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. 

आर्थिक मदत जाहीरमृत कामगारांना कंपनी प्रशासनाने प्रत्येकी ३० लाख रुपये आणि त्यांच्या वारसांना नोकरी अशी मदत जाहीर केली आहे. जखमींना रुग्णालयाचा खर्च आणि एक लाख रुपये मदत जाहीर केली आहे. शासनाकडूनही मृतांना पाच लाख रुपये मदत जाहीर केल्याचे प्रांत अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांनी सांगितले.

एकुलता एक गमावलाकिल्ले रायगडावर जायचे, म्हणून दुपारऐवजी सकाळच्या सत्रात येणाऱ्या आदित्य मोरे (२२) याचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले. मोरे याचे वडील मेडिकलमध्ये काम करतात. एकुलत्या एका मुलाच्या निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. सतीशचे स्वप्न अपूर्णच सतीश साळुंखे याने नवी संधी मिळण्याच्या आशेने कंपनी जॉइन केली. ती जॉइन करून अवघे दोनच दिवस झाले होते. या कंपनीतून नवी आशा पाहणाऱ्या सतीशचे स्वप्नही अपूर्णच राहिले.

टॅग्स :Raigadरायगड