शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांत नोंदणीसाठी ज्येष्ठांचे हेलपाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:08 IST

पनवेलमधील अवस्था : कोरोना लसीकरणास अडथळा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ ते ५९ वर्ष असलेल्या विविध व्याधी जडलेल्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतदेखील लस देण्यात येत आहे. मात्र खासगी रुग्णालयांसोबत शासनाचा योग्य समन्वय नसल्याने दुसऱ्या दिवशी २ मार्च रोजी पनवेलमध्ये बऱ्याचशा खासगी रुग्णालयांत ज्येष्ठांना लस घेता आली नाही. दिवसाअखेर २१० ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे .     लसीकरणावेळी ऑनलाइन ॲपमध्ये गोंधळ कायम आहे. तसेच खासगी रुग्णालयासोबत कोणताही करार झाला नसल्याने तेथे लसीकरणास आणखी अवधी लागण्याची शक्यता आहे.     श्री सत्यसाई संजीवनी सेंटर ऑफ चाइल्ड हार्ट केअर खारघर, डॉक्टर पटवर्धन स्मृती रुग्णालय, पनवेल हॉस्पिटल - उरण नाका, उन्नती हॉस्पिटल, लाइफ लाइन हॉस्पिटल, बिरमोळे हॉस्पिटल, श्री साई मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, आशा मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल कळंबोली, येरळा मेडिकल कॉलेज, खारघर आदी खासगी रुग्णालयांत २५० रुपयांत हे लसीकरण करता येणार आहे.   कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या नागरिकांना लसीकरणासाठी अडथळे येत आहेत. पालिकेकडून एकाही नागरी आरोग्य केंद्रावर ही सुविधा उपलब्ध नाही. येरळा मेडिकल कॉलेज, टाटा रुग्णालय, खारघर येथे दुसऱ्या दिवशी लसीकरण करण्यात आले. तांत्रिक अडचणीमुळे अनेक ज्येष्ठांना लस न घेताच घरी परतावे लागले.  पनवेल परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी पनवेलवरून खारघर शहर गाठावे लागत आहे. विशेषतः पनवेलमधील ज्येष्ठ नागरिकांना हा त्रास सर्वात जास्त झाला. रजिस्ट्रेशनमध्ये अडथळे येत असल्याने मंगळवारी लस घेता आली नसल्याचे राजाराम पाटील (६३) या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत २१० ज्येष्ठ नागरिकांनी ही लस घेतल्याची माहिती पालिकेमार्फत देण्यात आली.

लसीकरणासाठी असलेल्या कोविन ॲपवर तांत्रिक अडचणीमुळे लसीकरणात अडचण निर्माण होत आहे. ही समस्या सर्वत्रच आहे. आम्ही जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर लस देता येईल याकरिता प्रयत्नशील आहोत.-डॉ आनंद गोसावी,वैद्यकीय अधिकारी, पनवेल महानगरपालिका

खासगी रुग्णालयात लसीकरण होत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना भरउन्हात रिकाम्या हाती परतावे लागत आहे. लसीकरणाबाबत गोंधळ कायम असल्याने ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.खासगी रुग्णालयांसोबत समन्वय नाहीखासगी रुग्णालयांसोबत पालिकेचा समन्वयाचा अभाव असल्याने दुसऱ्या दिवशीही बहुतांशी खासगी रुग्णालयांत लसीकरण झाले नाही. लस ठेवण्यासाठी स्टोरेज सिस्टीम, आवश्यक मनुष्यबळ आदी प्रश्न खासगी रुग्णालय प्रशासनाला सतावत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ट्रेनिंगही या रुग्णालयांना दिलेली नाही.