शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:31 IST

महामार्गावरील सुखकर प्रवासासाठी उपाययोजना : १० मदतकेंद्रांवर क्रेन, रुग्णवाहिकेची व्यवस्था, दिशादर्शक फलक

अलिबाग : गणेशोत्सव काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोकणात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने मोठ्या संख्येने चाकरमानी हा सण साजरा करण्यासाठी कोकणात आपल्या घरी जात असतात. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना त्यांना कोणताच अडथळा येऊ नये यासाठी रायगड पोलिसांनी सुमारे ५५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फौज तैनात केली आहे. अपघांतामुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी १० क्रेनची व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.

रायगडसह कोकणात बाप्पाचा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि धुमधडाक्यात साजरा करण्याची परंपरा आहे. कोकणामध्ये घरगुती गणपतीच्या मूर्तींची स्थापना करणाºया भक्तांची संख्याही सर्वाधिक आहे, तर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने काही दिवस आधी आपापल्या गावाकडे जातात. मुंबई-गोवा महामार्ग हा प्रमुख आणि महत्त्वाचा मार्ग असल्याने चाकरमानी याच मार्गाचा वापर करतात. गेल्या आठ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम सुरू आहे. सातत्याने ठेकादाराकडून कामात उशीर होत असल्याने काम अद्यापही अर्धवट स्थितीमध्येच आहे, यामुळे वाहतूक मंदावण्याची शक्यता असून वाहतूककोंडी होणार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यासाठी रायगड पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन पूर्ण केलेले आहे.वाहतूककोंडीचा त्रास गणेशभक्तांना होणार नाही याबाबत सर्व तयारी पूर्ण केली असल्याची माहिती जिल्हा वाहतूक विभागाचे प्रमख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, १३ पोलीस निरीक्षक, २० सहायक/उप पोलीस निरीक्षक ३८४ पोलीस कर्मचारी त्याचबरोबर महाविद्यालयाचे विद्यार्थी, पोलीस मित्र, विविध सामाजिक संघटनेच्या सदस्यांची १०० जणांची टीम बनवण्यात आली आहे, असेही वराडे यांनी स्पष्ट केले. वाहने बंद पडण्याचे अथवा अपघात झाल्याने वाहतूककोंडी होऊ शकते. यासाठी दहा वाहतूक मदतकेंद्रावर क्रेनही उपलब्ध करून ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे रुग्णवाहिकाही ठेवण्यात आल्याचे वराडे यांनी सांगितले.

माहितीपुस्तिका तयार 

च्वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, यासाठी माहितीपुस्तिकाही तयार करण्यात आली आहे. त्याचे वाटपही वाहनचालकांना करण्यात येणार आहे. जागोजागी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत, त्यामुळे गणेशभक्तांचा मार्ग सुकर होण्यास मदत मिळणार आहे.रायगड पोलिसांची दक्षताच्वाहतुकीचे नियमन करणाºया कर्मचाºयांना रेनकोटचेही वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रिप्लेक्टरवाले जॅकेट, एलईडी लाइट असणारे दिशादर्शक पोलीस कर्मचाºयांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत, त्यामुळे गणेशभक्तांना प्रवासात कोणताच त्रास होणार नाही याची दक्षता पोलिसांनी घेतली आहे.माणगावमध्ये चोख बंदोबस्तमाणगाव :शहरातील सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे महामार्गावरील होणारी वाहतूककोंडी. तसेच माणगाव शहर रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण मानले जाते. येणाºया गणेशोत्सवासाठी कोकणात येणाºया भाविकांची मोठी गर्दी असते. वाहतुकीचा चाकरमान्यांना, भाविकांना अडथळा होऊ नये, त्यामुळे माणगाव वाहतूक पोलीस आतापासूनच सज्ज झाले आहेत.कामानिमित्त बाहेरगावी मुंबई, पुणे, गुजरात आदी ठिकाणी राहणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणार आहेत. या वेळी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये याकरिता वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. त्यासाठी शहरात बॅरिकेड्स लावले आहेत.माणगाव येथील वाहतूक पोलीस विशाल येलवे व त्यांचे सहकारी हे चोख बंदोबस्त करीत असून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाºया वाहनचालकांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर ई-चलनामुळे ताबडतोब दंडात्मक कारवाई करीत आहेत. त्यामुळे बेदरकारपणे वाहन चालवणाºया वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. तसेच अनधिकृत पार्किंग करणाºयांवरसुद्धा माणगाव वाहतूक पोलिसांकडून ताबडतोब कारवाई होत आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत असून, माणगावकर पोलिसांच्या कार्याबाबत समाधानी आहेत.