शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सेंट्रल पार्कच्या दुसऱ्या टप्प्यातील रखडपट्टी सुरूच; ऑनलाइन याचिकेत 3 दिवसांत २५०० नागरिकांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 23:09 IST

ऑनलाइन जनहित याचिका दाखल करण्यासाठी तुकाराम कंठाळे यांनी पुढाकार घेतला आहे.

वैभव गायकरपनवेल : लंडनच्या धर्तीवर खारघर शहरात उभारण्यात आलेल्या सेंट्रल पार्कचा दुसरा टप्पा मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. सिडकोने सेंट्रल पार्कची जाहिरात केल्याने या परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घरे खरेदी केली. मात्र, कालांतराने सिडकोने सेंट्रल पार्कच्या नियोजित दुसºया टप्प्यातील जागा खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा डाव सुरू केला. दुसºया टप्प्याचे काममार्गी लावण्यास नेमका कोणता अडथळा आहे? असा प्रश्न उपस्थित करीत खारघरमधील काही जागरूक नागरिकांनी यासंदर्भात ऑनलाइन याचिका दाखल केली आहे.

ऑनलाइन जनहित याचिका दाखल करण्यासाठी तुकाराम कंठाळे यांनी पुढाकार घेतला आहे. तीन दिवसांत २५०० पेक्षा जास्त रहिवाशांनी यात सहभाग घेत पाठिंबा दर्शविला आहे. सिडकोमार्फत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असताना दुसरा टप्पा रखडण्यामागचे कारण काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

खारघर सेक्टर २३ आणि २४ मध्ये सिडकोने ३० हेक्टर जागेवर सेंट्रल पार्क साकारले आहे. सध्याच्या घडीला एकूण जागेचा ७५ टक्के भाग विकसित केला गेला आहे. दुसºया टप्प्याचा विकास अद्याप प्रस्तावित आहे. सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, यांनी सेंट्रल पार्कच्या दुसºया टप्प्याच्या विकासाला निर्णायक गती दिली होती. सार्वजनिक व खासगी भागीदारीतून त्यांनी दुसरा टप्पा विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. याकरिता २०१४ मध्ये वित्तीय सल्लागार समितीची नियुक्तीही करण्यात आली होती. या सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार, स्पर्धात्मक निविदाही मागविण्यात आल्या होत्या. अंतिम प्रक्रियेत भारतातील पहिल्या दहा अग्रगण्य कंपन्यांचा समावेश असलेल्या चेन्नईस्थित व्हीपीजी युनिव्हर्सल किंग्डम या कंपनीची अंतिम निवड करण्यात आली होती.

संबंधित कंत्राटदार कंपनीची निवड होऊन तब्बल पाच वर्षांचा कार्यकाळ लोटला तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. तब्बल पाच वर्षे सिडको केवळ सेंट्रल पार्कची जाहिरात करीत आहे. येथील रहिवाशांनी सेंट्रल पार्क प्रकल्पाकडे पाहून दुप्पट दर मोजून घरे खरेदी केली आहेत. त्यांना संपूर्णत: विकसित सेंट्रल पार्कची प्रतीक्षा कायम आहे.

सिडकोच्या नियोजित दुसºया टप्प्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय, अम्युझमेंट पार्क, वॉटर पार्क, स्नो पार्क, तारांकित हॉटेल्स, व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी गेम्स आदीसह एस्सल वर्ल्ड व इमॅजिका पेक्षाही भव्यदिव्य असा दुसरा टप्पा असणार आहे. सध्याच्या घडीला हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र व सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्यावर येऊन ठेपली आहे.विशेष म्हणजे, दुसºया टप्प्यातील कामे मार्गी लावण्याची जबाबदारी सिडको संचालक बोर्डावर येऊन ठेपली आहे.

मुख्यमंत्र्यांना १५०० सह्यांचे पत्रसेंट्रल पार्कच्या दुसºया टप्प्याची रखडपट्टी लक्षात घेता माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राचे महाराष्ट्र सचिव तुकाराम कंठाळे यांनी खारघरमधील १५०० हजार नागरिकांचे सह्यांचे पत्र मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात दिले आहे. सेंट्रल पार्कचा प्रकल्प मार्गी लावा, अशी याचना पत्रात करण्यात आली आहे.

सेंट्रल पार्क बद्दल सिडकोने आम्हाला दिलेली आश्वासने पाळावीत. आम्हाला आणखी आठ वर्षे वाया घालवायची नाहीत. - संजीव नायर, रहिवासी, खारघर