शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल परिसरात बोगस डॉक्टरांविरोधात लवकरच शोध मोहीम

By वैभव गायकर | Updated: May 16, 2024 15:33 IST

आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने पनवेल पालिकेच्या उपाययोजना  

पनवेल:पनवेल महानगरपालिकेने आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.यादृष्टीने पालिका क्षेत्रात 15 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र कार्यरत आहेत.पालिका हद्दीतील खाजगी डॉक्टरांची माहिती आपल्याकडे उपलब्ध असावी यादृष्टीने पालिकेने केलेल्या अवाहनाला खाजगी डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेकडून लवकरच विशेष मोहीम राबविली जाणार आहे.

खासगी डॉक्टरांची पालिकेकडे नोंदणी असल्यास पालिका क्षेत्रातील डॉक्टरांची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध होईल याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाने खाजगी डॉक्टरांना पालिकेकडे नोंदणी करण्याचे अवाहन वेळोवेळी केले आहे.हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच डॉक्टरांनी पालिकेकडे नोंदणी केली आहे.वारंवार अवाहन करून देखील पालिकेच्या आरोग्य प्रशासनाला प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी भरारी पथक स्थापन करून पालिका हद्दीतील खाजगी डॉक्टरांची तपासणी मोहीम हाती घेण्याचे निश्चित केले आहे.

आयुक्त डॉ प्रशांत रसाळ  यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम लवकरच सुरु होणार आहे.या मोहिमेत डॉक्टरांची मान्यताप्राप्त मिडिकल कौन्सिल च डिग्री,मिळालेल्या डिग्रीच्या आधारावर रुग्णांचे उपचार होते का ?,प्रॅक्टिस करताना वैद्यकीय विभागाचे नॉर्म्स पाळले जातात का ? आदींसह वैद्यकीय विभागाच्या निगडित चौकशी पालिकेचे पथक करणार आहे.वाढत्या बाळ माता मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने तसेच डेंग्यू आणि मलेरिया सारख्या रुग्णांची अद्ययावत माहिती पालिकेला उपलब्ध होण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी पुढाकार घेतला आहे.

शासनाच्या माता बाळ मृत्युदर कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अन्वेषक कमिटीच्या बैठकीत देखील वेळोवेळी याबाबत चर्चा करण्यात आली.पनवेल महानगरपालिका हद्दीत 600 ते 700 खाजगी डॉक्टर प्रॅक्टिस करतात.मात्र यापैकी केवळ 15 ते 20 डॉक्टरांनीच पालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी केली आहे.याकरिता परिपत्रक काढुन देखील खाजगी डॉक्टर पालिका प्रशासनाला जुमानत नसल्याचे दिसुन येत आहे.

पालिका हद्दीत जवळपास 700 खाजगी डॉक्टर वेगवेगळ्या शहरात,ग्रामीण भागात तसेच एमआयडीसी परिसरात प्रॅक्टिस करत आहेत.या डॉक्टरांकडून शेकडो रुग्णांची तपासणी नियमित केली जाते.यामध्ये डेंग्यू आणि मलेरिया सारख्या रुग्णांचा समावेश आहे.मात्र हि माहिती पालिका प्रशासनाला उपलब्ध होत नाही. माता बाळ मृत्यू ,साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्याचे पालिकेसमोर आव्हान आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीत  बोगस त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर चा  सुळसुळाट झाला आहे. या डॉक्टरांकडे  महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ची त्वचा रोग  तज्ज्ञ म्हणून  प्रॅक्टिस करण्याकरिता आवश्यक असलेली कोणतीही  डिग्री किंवा डिप्लोमा नसताना सर्रास पणे  त्वचा रोग तज्ज्ञ आणि लेसर  थेरपी च्या नावाखाली  व्यवसाय करत आहेत.   स्किन, कॉस्मेटिक आणि  लेसर या गोंडस नावाखाली   ग्राहकांची दिशाभूल करण्याचे काम चालू आहे.असे बोगस त्वचारोग तज्ञांवर देखील पालिका कारवाई करणार आहे.

सर्व खाजगी डॉक्टरांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे स्वतःची डिग्री आणि क्लिनिकची माहिती लवकरात लवकर पालिकेकडे द्यावी.जेणे करून पालिकेला डॉक्टारांबाबत माहिती मिळेल.बोगस डॉक्टरांमार्फत रुग्णांवर उपचार केले जात असतील तर नागरिकांनी थेट आमच्याकडे तक्रार केल्यास निश्चितच कारवाई केली जाईल.- डॉ आनंद गोसावी (मुख्य वैद्यकीय अधिकारी,पनवेल महानगरपालिका )