शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

वांद्रे कोंड येथे बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:39 IST

गेल्या १५ दिवसांत दासगावमधील वांद्रे कोंड येथे बिबट्याने दहशत माजवत नऊ गुरांचा फडशा पाडला, तर बिबट्याच्या हल्ल्यातून बचावलेल्या एका गाईवर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत

दासगाव : गेल्या १५ दिवसांत दासगावमधील वांद्रे कोंड येथे बिबट्याने दहशत माजवत नऊ गुरांचा फडशा पाडला, तर बिबट्याच्या हल्ल्यातून बचावलेल्या एका गाईवर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. दुभत्या जनावरांवर होणारे हल्ले आणि भरदिवसा येथील काही ग्रामस्थांना बिबट्याचे झालेले दर्शन यामुळे दासगाव वांद्रे कोंड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रायगड किल्ल्याकडून येणारा डोंगर भाग आणि माणगाव तालुक्याला जोडलेल्या जंगलामध्ये दासगाव भागातील वांद्रे कोंड ही एक वाडी आहे. केवळ २२ घरांची वस्ती असलेल्या येथील रहिवाशांचा मुख्य व्यवसाय दूधदुभते हाच आहे. त्यामुळे वांद्रे कोंड येथील माणसांच्या प्रमाणात गुरांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या १५ दिवसांपासून दासगाव वांद्रे कोंड आणि लगत असलेल्या बामणे कोंड परिसरात बिबट्याचा संचार आढळून आला आहे. येथील ग्रामस्थांकडून गाय, वासरू, बैल आणि खोंडावर बिबट्याने हल्ले चढवले आहेत. ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार १० जनावरांवर बिबट्याने हल्ला चढवला आहे. यामध्ये बामणे कोंड येथील रमेश मोरे यांची गाय बचावली असून, तिच्या मानेला आणि तोंडाला दुखापत झाली आहे.दासगावमधील गुरांचे डॉक्टर उदय इनामदार हे गाईवर आठवडाभरापासून उपचार करत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यातून वाचलेली ही गाय आजही भेदरलेल्या अवस्थेत असून वाड्याच्या बाहेर पडत नाही. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे दासगाव परिसरात दहशत पसरली आहे. गाई-गुरांप्रमाणे आता रात्रीच्या वेळी बाहेर पडताना माणूसदेखील घाबरत आहे.बिबट्याच्या हल्ल्यात गुरे दगावलेले ग्रामस्थगेल्या १५ दिवसांत वांद्रे कोंड परिसरात बिबट्याने आपली दहशत माजवत वांद्रे कोंड आणि बामणे कोंड येथील सुनील वनगले यांचा बैल, रमेश राणे यांचा पाडा खोंड, दिलीप दुडे यांची गाय अशी तीन गुरे तर वांद्रे कोंड येथील अनिल लुष्टे यांची गाय, रामा लुष्टे यांचा पाडा, मंगेश कामेकर यांचा पाडा, सदानंद वांद्रे यांची गाय, रमेश वांद्रे यांचे दोन बैल असे बामण कोंड आणि वांंद्रे कोंड येथील आठ ग्रामस्थांच्या ९ गुरांचा गेल्या १५ दिवसांत फडशा पाडला आहे.मादी आणि दोन पिल्लांचा वावरवांद्रे कोंड येथील ग्रामस्थांनी जंगल परिसरात मादी आणि दोन बिबट्याची पिल्ले पाहिली असल्याचे सांगितले. येथील गुराखी अनिल लुष्टे यांची गुरे चरत असता त्यांच्या नजरेसमोर एक गाय बिबट्याने उचलून नेली आहे. तर विनायक वांद्रे महाडमधून गावात परत येत असताना नवीन रस्त्याच्या कडेला बिबट्याला पाहिले. प्रसंगावधान दाखवत ते जीवाच्या आक ांताने ओरडले आणि बिबट्या पळून गेला, असेदेखील येथील ग्रामस्थ सांगत आहेत.