शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाडमधील सावित्री, गांधारी पात्रातील उंचवटे हटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 00:24 IST

महाड शहरातील पूर परिस्थितीला कारणीभूत ठरणारे सावित्री नदीपात्रातील जुठे (उंचवटे) काढण्याची तयारी एका ठेकेदार कंपनीने दाखविली आहे.

- संदीप जाधव महाड : महाड शहरातील पूर परिस्थितीला कारणीभूत ठरणारे सावित्री नदीपात्रातील जुठे (उंचवटे) काढण्याची तयारी एका ठेकेदार कंपनीने दाखविली आहे. मात्र यातील काही जुठे हे खासगी मालकीचे आहेत. या मालकांनी या जुठ्यांचा मोबदला मागितल्याने हे काम होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.संबंधित जुठे मालकांशी या संदर्भात प्राथमिक चर्चा करण्यासाठी महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी रविवारी एका बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत काही जमीन मालकांनी बाजारमूल्यानुसार या जुठ्यांची किंमत देण्यात यावी किंवा त्याच क्षेत्रफळाची पर्यायी जागा अन्यत्र देण्यात यावी, अशी मागणी केली. या जुठ्यातून काढण्यात येणारी माती व दगड, गोटे हे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात वापरले जाणार आहे.सावित्री, गांधारी नदीपात्रात चांभारखिंड (४.७९ हेक्टर) , वडवली (0.९६ हेक्टर), दादली (३.८३ हेक्टर) ही तीन उंचवटे खासगी मालकीची आहेत. तर केंबुर्ली आणि पाले गावाच्या हद्दीतील उंचवटे शासकीय मालकीची आहे. सावित्री नदीपात्रात गाळ साठून ही उंचवटे तयार झाली आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत, नदीपात्रात पाण्याला या उंचवट्यांमुळे फुगवटा येतो आणि त्यामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण होत असते. ही उंचवटे काढल्यास हा फुगवटा 0.२0 मीटर्सने कमी होऊन पूर परिस्थिती नियंत्रणाखाली येऊ शकते.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करणाऱ्या एल अँड टी कंपनीला या कामासाठी माती दगड गोट्यांची आवश्यकता असल्याने महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी ही उंचवटे काढण्यास एल अँड टी कंपनीला राजी केले आणि संबंधित मालकांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत या उंचवट्यांची कोणतीही किंमत संबंधित जमीन मालकांना देण्यात येणार नाही. मात्र येथील माती आणि दगड गोट्यांच्या रॉयल्टीचा काही भाग त्याचप्रमाणे डंपरमागे काही ठराविक रक्कम मालकांना देण्याबाबत एल अँड टी कंपनीशी चर्चा करु न जिल्हाधिकाºयांबरोबरच्या बैठकीत त्यावर निर्णय घेण्याचे इनामदार यांनी स्पष्ट केले.बैठकीला संजय परांजपे, अस्लम पानसरे, सुभाष रवळेकर, प्रदीप मेहता, शेखर सावंत यांच्यासह इतर मालक उपस्थित होते. सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.>नदीपात्रातील उंचवट्यांच्या बदल्यात पर्यायी जागेची मागणीजमीन मालकांनी ही उंचवटे ताब्यात देताना, त्यांचा मोबदला म्हणून बाजारभावानुसार होणारी किंमत किंवा त्याच क्षेत्रफळाची पर्यायी जागा अन्यत्र देण्याची मागणी करणारा अर्ज प्रांताधिकाºयांना केला. मात्र या मागणीला प्रांताधिकाºयांनी असमर्थता दर्शविली. जे मालक संमती देतील त्यांचे बेट काढून टाकण्यात येईल आणि उर्वरित उंचवटे तशीच ठेवण्यात येतील, असे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी स्पष्ट केले.