शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्यातील महत्त्वाच्या कागदपत्रांचे जतन करा, संभाजीराजे यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:41 IST

रायगड किल्ल्याबाबत महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध झाल्यास त्याचे जतन करून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी. उत्खनन करताना ज्या इतिहासकालीन बाबी सापडतील त्यांची योग्य ती निगा राखावी.

विशेष प्रतिनिधी अलिबाग : रायगड किल्ल्याबाबत महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध झाल्यास त्याचे जतन करून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी. उत्खनन करताना ज्या इतिहासकालीन बाबी सापडतील त्यांची योग्य ती निगा राखावी. पूर्ण कामांची व्हिडीओ शूटिंग करावी. सर्वांनी एकत्र येऊन किल्ले रायगड व परिसराच्या विकासाची कामे तत्काळ सुरू करावीत, यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, असे निर्देश रायगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी संध्याकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित आढावा बैठकीत बोलताना दिले आहे.खासदार संभाजीराजे यांनी या बैठकीत रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखड्याचा आढावा घेतला. तसेच प्राधिकरणातील संबंधित अधिकाºयांना किल्ले रायगड आणि परिसर विकासाची कामे करताना कोणत्या तांत्रिक अडचणी येत आहेत, याची माहिती करून घेतली. अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, ई-निविदा या बाबत काही अडचणी असल्यास त्यांचे तत्काळ निराकरण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या.भारतीय पुरातत्त्व विभागाकडे प्रलंबित प्रस्तावांचा पाठपुरावा करून त्यास मान्यता घेण्यात यावी. आराखड्यातील प्रस्तावित केलेल्या कामांचे वर्गीकरण करून भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड किल्ला विशेष स्थापत्य पथक यांनी त्यांना सोपविलेली कामे करावीत, अशा सूचना देण्यात आल्या. किल्ले रायगडावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धनाची कामे करताना ती भारतीय पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीत व खबरदारी बाळगून करावीत, असेही खासदार संभाजी राजे यांनी स्पष्ट केले.या वेळी बैठकीस कोकण विभागीय आयुक्त जगदिश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, निमंत्रित सदस्य रघुजीराजे आंग्रे, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, प्राधिकरणाचे सदस्य आदी उपस्थित होते. रायगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ल्याच्या विकासाच्या कामांना गती द्यावी अशी सूचना के ली.

टॅग्स :Raigadरायगड