शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

सौरभचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 05:32 IST

समुद्रात असणाºया कुलाबा किल्ल्यातून मंगळवारी दुपारी २च्या सुमारास भरतीच्या पाण्यातून अलिबाग किनाºयाकडे येत असताना बुडून बेपत्ता झालेल्या दोघा पर्यटकांपैकी सौरभ खान (२३) याचा मृतदेह बुधवारी सकाळी ७.३० वाजता आढळला.

अलिबाग : समुद्रात असणाºया कुलाबा किल्ल्यातून मंगळवारी दुपारी २च्या सुमारास भरतीच्या पाण्यातून अलिबाग किनाºयाकडे येत असताना बुडून बेपत्ता झालेल्या दोघा पर्यटकांपैकी सौरभ खान (२३) याचा मृतदेह बुधवारी सकाळी ७.३० वाजता आढळला. नैसर्गिक भरतीच्या वेळी तुषार शासकीय विश्रामगृहाजवळ अलिबाग समुद्रकिनारी पोहोचला.त्याच्यासोबत बेपत्ता झालेल्या ऋषभ सिव्हा (२४, रा. रसायनी, मूळ रा. गोवा) याच्या शोधासाठी अलिबाग कोळीवाड्यातील कोळी बांधवांच्या सहकार्याने कुलाबा किल्ला परिसरात शोध मोहीम सुरू असल्याची माहिती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली. मृत सौरभ खान हा मूळचा गुजरातमधील रतलाम येथील राहणारा असून, त्याचे नातेवाईक त्याचा मृतदेह ताब्यात घेण्याकरिता येथील जिल्हा रुग्णालयात पोहोचले आहेत. शवचिकित्सा झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.सांगून ऐकले नाही- महेंद्र पवाररसायनीमधील डेकोर होम कंपनीमध्ये सिव्हिल इंजिनीअर म्हणून कार्यरत असलेले हेबल प्रधान, उरप मिश्रा, सुरेश स्वामी, सौरभ खान, वृषभ सिव्हा हे पाच जण फिरायला आले. यापैकी सुरेश, सौरभ, वृषभ हे कुलाबा किल्ला पाहण्यासाठी ओहोटीच्या वेळी चालतच किल्ल्यात गेले होते, तर अभिराम व उरप हे दोघे किनाºयावरच थांबले होते. दुपारी २ वाजता भरती सुरू झाल्यावर किल्ल्यात गेलेल्या एकूण आठ पर्यटकांनी या भरतीतून किनाºयाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी या आठ जणांना भरतीच्या पाण्यातून जाऊ नका, तुम्हाला समुद्राच्या भरतीचा अंदाज येणार नाही, असे या किल्ल्यात कार्यरत पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी महेंद्र पवार यांनी सांगितले.पाच जण पवार यांची विनंती मान्य करून किल्ल्यातच थांबले; परंतु सुरेश स्वामी, सौरभ खान, वृषभ सिव्हा हे तिघे भरतीच्या पाण्यातून किनाºयाकडे गेले, अशी माहिती पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी महेंद्र पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सुरेश स्वामी हा सुदैवाने पोहत किनाºयावर पोहोचल्याने सौरभ खान व वृषभ सिव्हा बुडाल्याची माहिती समजली. दरम्यान, या पाच जणांना लाइफ गार्डच्या बोटीने किनाºयावर सुखरूप नेण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले.>जुम्मापट्टी येथील धबधब्यावर तरु णाचा मृत्यूनेरळ-माथेरान घाट रस्त्यावरील जुम्मापट्टी येथील धबधब्यावर दगडावरून पाय घसरून उल्हासनगर येथील तरु णाचा मृत्यू झाला.उल्हासनगर येथील चार तरु णांचा गट १५ आॅगस्टला सकाळी जुम्मापट्टी धबधब्यात आला होता. अर्धा तास मजा के ल्यानंतर भीमान रोहरा हा तरु ण धबधब्यावर चढू लागला. तेथे मका कणीस विकणारे दिनकर दरवडा यांनी शेवाळावरून पाय घसरतो, असे सांगून अडविण्याचा प्रयत्न केला. तरी भीमान वर चढत होता. धबधब्याच्या तिसºया टप्प्यावर असताना तो दगडावरून पाय घसरून खाली आदळला. खाली दगड असल्याने डोक्यातून रक्तस्राव होऊन भीमानचा जागीच मृत्यू झाला.नेरळ पोलिसांना ही माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सोमनाथ जाधव हे सहकाºयांसह तेथे पोहचले. भीमानचा मृतदेह कर्जत येथीलउपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.