शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

सरपंच, उपसरपंचांना पदावरून काढा

By admin | Updated: January 26, 2017 03:24 IST

घरबांधणी परवानगी व कर आकारणीसंदर्भात नियमबाह्य कार्यवाही करून पदाचा गैरवापर व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी

वडखळ : घरबांधणी परवानगी व कर आकारणीसंदर्भात नियमबाह्य कार्यवाही करून पदाचा गैरवापर व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मी नाईक, उपसरपंच मिलिंद मोकल यांना पदावरून काढून टाकण्याचे आदेश कोकण विभाग आयुक्तांनी दिले आहेत.यासंदर्भात वडखळ ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश पाटील यांनी सरपंच व उपसरपंचाविरोधात कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्र ार अर्ज दाखल केला होता. त्यावर कोकण विभागीय आयुक्तांकडे सुनावणी झाली. त्यात सरपंच, उपसरपंच यांच्यावरील आरोप सिध्द झाले असल्याने कोकण विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ (१ ) अन्वये वडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मी नाईक, उपसरपंच मिलिंद मोकल यांना पदावरु न तसेच ग्रामपंचायत सदस्य पदावरु न काढून टाकण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत. वडखळ ग्रामपंचायतीच्या १९ सप्टेंबर २०१५ च्या मासिक सभेच्या इतिवृत्ताचे अवलोकन केले असता हिराबाई जोमा पाटील (रा. वडखळ) ८ सप्टेंबर २०१५ रोजीचा घर क्र मांक २३३ दुरु स्तीसाठी परवानगी मिळणेबाबतच्या अर्जावर सिडको प्राधिकरणाची (नैना) पूर्वपरवानगी घेऊन घरदुरु स्ती करण्यास हरकत नाही अशा आशयाचा ठराव पारित करण्यात आला आहे. तसेच हरिओम बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स यांचा १० सपटेंबर २०१५ रोजीचा सर्वे नंबर ९/१ मध्ये घर क्र मांक ८३३अ, ८३३ ब, १२८२ या क्षेत्रामध्ये घर दुरुस्ती मिळण्याबाबतच्या अर्ज प्रकरणी १ ते १६ शर्ती नमूद करून ना हरकत दाखला दिला नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच ११ नोव्हेंबर २०१५ च्या मासिक सभेत परशुराम पाटील (रा. वडखळ) यांच्या स्वत:च्या मालकी गावठाणामध्ये ३३ बाय १२ च्या जागेत ३ खोल्या बांधल्या आहेत. त्यास घरपट्टी लावण्याबाबत अर्जाप्रमाणे जागेसंदर्भात कागदपत्रे सादर केल्यानंतर घरपट्टी लावण्यात यावी अशा आशयाचा ठराव पारित केल्याचे दिसून येत आहे तर मिलिंद मोकल यांच्या इंद्रनगर येथील स्वत:च्या मालकीच्या जागेत ३० बाय २० स्केअर फुटाच्या नवीन बांधलेल्या घराला घरपट्टी लावण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही अर्जासोबत अर्जदारांनी कोणतीच कागदपत्रे सादर केली अथवा कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे हे या ठरावात स्पष्टपणे नमूद केले नाही असे निष्कर्ष कोकण आयुक्तांनी या चारही प्रकरणाच्या चौकशीत काढले आहेत.सरपंच व ग्रामसेवक यांनी आपले कर्तव्य पूर्णपणे पार पाडल्याचे दिसून येत नाही. या प्रकरणी सरपंच लक्ष्मी नाईक व उपसरपंच मिलिंद मोकल यांना पदावरून तसेच ग्रामपंचायत पदावरून काढण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)