शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पगडीचा डोंगर सरसगड...

By राजेश भोस्तेकर | Updated: August 13, 2023 14:21 IST

रायगड जिल्ह्यातील या गडकिल्ल्यांमध्ये काही असे किल्ले आहेत जे आजही अपरिचित राहिले आहेत.

- राजेश भोस्तेकर

रायगड जिल्ह्यातील या गडकिल्ल्यांमध्ये काही असे किल्ले आहेत जे आजही अपरिचित राहिले आहेत. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात वसलेला सरसगड त्यापैकीच एक. सरसगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून रायगड जिल्ह्यातील पाली डोंगर रांगेतील सरसगड किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने चढाईसाठी मध्यम समजला जातो. पाली हे अष्टविनायकांपैकी एक ठिकाण. पाली गावात जाताच या गडाचे दर्शन होते. पाली गावच्या दक्षिणोत्तर सीमेवर सरसगडाची अजस्र भिंत उभी आहे. 

या गडाचा उपयोग मुख्यत: टेहळणीसाठी होत असावा, शिवाजी महाराजांनी या गडास आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतले आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी  दाेन हजार होन मंजूर केले. स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत या गडाची व्यवस्था भोर संस्थानांकडे होती. सरसगड दूरवरून पगडीसारखा दिसतो. त्यामुळे त्यास पगडीचा किल्लाही म्हटले जाते. बाजूला तीन सुळके असलेला डोंगर तीन  कावडीचा डोंगर म्हणूनही ओळखला जातो.

कसे जावे?

गडाला दोन प्रवेशद्वार असले तरी गडावर जाण्याचा प्रमुख मार्ग हा दिंडी दरवाजातून आहे आणि अलीकडे हा एकच मार्ग वापरात आहे. दिंडी दरवाजापर्यंत जाण्यासाठी पाली गावातून गेलेली एक पायवाट आपल्याला एक तासाच्या चढाईनंतर गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांपर्यंत आणून सोडते. ही वाट मळलेली असल्याने आणि जागोजागी दिशादर्शक असल्यामुळे या मार्गावरून जाताना चुकण्याची शक्यता फार कमी आहे.

ही ठिकाणे पाहण्यासारखी 

सरसगड हा किल्ला त्याच्या थरारक पायऱ्यांच्या रचनेमुळे अलीकडे प्रसिद्धीस येत आहे. सरसगडावरील पायऱ्या चढण्याआधी डाव्या बाजूला एक लहानसे भुयार लागते. हे भुयार अतिशय अरुंद आहे. या भुयारातून एकावेळी एकच व्यक्ती जाईल एवढीच जागा आहे. सरसगडावरील ८० अंश कोनातील या थरारक पायऱ्या अखंड दगडात कोरलेल्या असून त्यांची उंची दीड ते दोन फुटाएवढी आहे. सरसगड हा दोन-तीन तासात सहजपणे न्याहाळता येतो. पायऱ्या चढून  गेल्यावर समोर दिसणारी दिंडी दरवाजाला लागूनच असलेले तिहेरी तटबंदीचे रचना आपणास बघायला मिळते.

 

टॅग्स :Fortगड