नांदगाव/ मुरु ड : मुरु ड तालुक्यातील शीघ्रे ग्रामपंचायत हद्दीत नागशेत गावात राहणारे संजय सुर्वे यांना त्यांच्याच गावात राहणारे रवींद्र अदावडे, गणपत अदावडे, अविनाश अदावडे व आकाश अदावडे यांनी पूर्ववैमनस्याचा राग मनात धरून रात्री लाकडाच्या ओंडक्याने बेदम मारहाण के ली. या घटनेची नोंद मुरु ड पोलीस ठाण्यात २० जानेवारी रोजी नोंदवण्यात आली. परंतु या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.वास्तविक पहाता गंभीर दुखापत असताना ३२६ अथवा इतर कलमांचा वापर होणे आवश्यक होते, परंतु जुजबी कलम वापरल्याने आरोपींना त्वरित जामीन मंजूर झाला. त्यामुळे मला न्याय मिळाला नाही असे संजय सुर्वे यांचे म्हणणे आहे. संजय सुर्वे हे ग्रामीण रु ग्णालयात उपचार घेत आहेत. मी गंभीर जखमी अवस्थेत मुरु ड पोलीस ठाण्यात फोन करून मला हॉस्पिटलमध्ये इलाजासाठी नेण्यात यावे अशी मागणी केली. त्यासाठी गाडी घेऊन यावे अशी विनंती केली असता फोनवर असणाऱ्या महिला पोलिसांनी गाडी उपलब्ध नाही, तुम्ही स्वत:हून पोलीस ठाणे गाठा असा सल्ला दिला. मला मारहाण करणारे मोकाट फिरत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी संजय सुर्वे यांनी केली. मुरुड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रणजित मोहिते यांना विचारणा केली असता डॉक्टर सर्टिफिकेट जर गंभीर दुखापतीचे मिळाले तर कायद्याप्रमाणे कलम ३२६ अथवा त्यापेक्षा कठोर कलमांचा वापर करू. पोलीस जनतेला न्याय देण्यासाठीच आहेत, गुन्हा दाखल करताना डॉक्टरांच्या दाखल्यावर कारवाईचे स्वरूप अवलंबून असते, असे सांगितले. (वार्ताहर)
संजय सुर्वे यांना मारहाण
By admin | Updated: February 1, 2017 00:53 IST