शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

साळविंडे शाळेतील विद्यार्थ्यांच्या नावासह झेपावणार मंगळयान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 00:29 IST

नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेची बहुउद्देशीय मंगळ मोहीम जुलै २०२० च्या दरम्यान प्रस्तावित आहे.

म्हसळा : नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेची बहुउद्देशीय मंगळ मोहीम जुलै २०२० च्या दरम्यान प्रस्तावित आहे. हे मंगळयान रायगड जिल्हा परिषद शाळा साळविंडे शाळेतील विद्यार्थ्यांची नावे सोबत घेऊन अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील प्रक्षेपण केंद्रातून मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. यासाठीची आॅनलाइन नोंदणी नुकतीच साळविंडे शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांची करण्यात आली आहे. यासाठी मिळालेल्या सर्व बोर्डिंग पासचे सर्व विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले.मानवाचे पाऊल मंगळ ग्रहावर पडण्याअगोदर आपले नाव मंगळावर पाठविण्याची संधी नासा या संस्थेने मार्स २०२० या मंगळयानाच्या माध्यमातून जगभरातील सर्व जनतेला उपलब्ध करून दिली आहे. अतिशय सूक्ष्म आकाराच्या चिपवर सर्वांची नावे कोरून ती चिप या यानासोबत मंगळ ग्रहावर पाठविली जाणार आहे. हे रोव्हर मंगळ ग्रहावर उतरून मंगळावर कधीकाळी सूक्ष्मजीव होते किंवा असतील का याचा अभ्यास करून त्याची माहिती पृथ्वीवर पाठविणार आहे. ही मोहीम भविष्यात मंगळावर माणूस पाठविण्याच्या दिशेने अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. जनसामान्यांमध्ये अवकाश संशोधनाबद्दल जनजागृती व्हावी तसेच विद्यार्थी प्रेरित होऊन भविष्यात त्यांच्यामधून अनेक अंतराळवीर पुढे यावे यासाठी या संस्थेने मंगळावर नाव पाठविण्याचा उपक्रम राबविला आहे.साळविंडे ही म्हसळा तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील जिल्हा परिषदेची शाळा. शेजारच्या वाडी वस्तीतील विद्यार्थी डोंगरातून वाट काढून या शाळेत शिकण्यासाठी येतात. शिक्षक संदीप जाधव व गणेश अकोलकर यांनी मुख्याध्यापक भगवान सोनुने यांच्या सहकार्याने १ ली ते७ वीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या नावाची आॅनलाइन नोंदणी केली आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये मंगळ ग्रहाबद्दल उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थी प्रेरित होऊन मंगळ ग्रह व नासा या संस्थेबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेताना दिसत आहेत. या कामात साळविंडे देवळाची वाडी, बागाची वाडी, व ताडाची वाडी या गावातील पालक व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सुद्धा विद्यार्थ्यांना मदत करत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षकांचे विशेष कौतुक होत आहे.>विद्यार्थ्यांची मार्स २०२० या प्रकल्पासाठी नोंदणी करून आम्ही विद्यार्थ्यांना विज्ञान साक्षरतेचा दिशेने नेत आहोत. भविष्यात निश्चितच या विद्यार्थ्यांकडून विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत.- संदीप जाधव,विज्ञान शिक्षक.>आमच्या सरांनी मंगळयानासाठी आमची नोंदणी करून आमची या ग्रहाविषयीची उत्सुकता वाढविली आहे.- साहिल जयेश सावंत, विद्यार्थीविद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विविध उपक्रमात सहभागी करून त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक अनुभव देऊन प्रेरित करत आहेत.- गणेश भुवड, एस.एम.सी. अध्यक्ष.