शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

लीना पवारच्या जिद्दीला सलाम

By admin | Updated: June 20, 2017 06:09 IST

जिद्द, चिकाटी आणि अपार कष्ट करण्याच्या बरोबरीला पालकांसह शाळेची साथ असेल, तर जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करता येते.

अलिबाग : जिद्द, चिकाटी आणि अपार कष्ट करण्याच्या बरोबरीला पालकांसह शाळेची साथ असेल, तर जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करता येते. हे अलिबाग येथील लीना पवार या विद्यार्थिनीने सार्थ करून दाखवले आहे. दुर्धर आजाराने आजारी असतानाही लीनाने दहावीच्या शालान्त परीक्षेत ९५.२ टक्के गुण मिळवले आहेत. तिच्या या यशावर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतात, तर शिक्षक व शाळा हे मुलांचे दुसरे पालक असतात. हे म्हणणे अलिबागमधील सेंट मेरी शाळेने शब्दश: खरे करून दाखवले आहे. लीना विठ्ठल पवार ही दहावीतील विद्यार्थिनी दुर्धर आजाराने आजारी असताना, सेंट मेरी शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन, शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी लीनाच्या उपचारांसाठी लागणारा लाखो रुपयांचा निधी वर्गणी काढून जमा केलाच; परंतु शिक्षकांनी लीनाच्या घरी जाऊन तिचा अभ्यासक्र मही पुरा केला. त्यामुळे शैक्षणिक वर्षातील निम्मे वर्ष अंथरुणाला खिळून असणाऱ्या लीनाने दहावीच्या परीक्षेत ९५.२ टक्के गुण मिळवून आपल्या शाळेचा विश्वास सार्थ ठरवला आहे.लीनाच्या आई माधवी धांडे या घटस्फोटित आहेत. त्या एकट्याच राहत असल्याने लीनाच्या स्कोलायसिस या दुर्धर आजारावरील शस्त्रक्रियेसाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च ऐकून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली होती; परंतु सेंट मेरी शाळेच्या मुख्याध्यापक मीना यांनी सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना लीनासाठी मदत निधी उभारण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला पालकांनी प्रतिसाद देत, तब्बल तीन लाख रुपये जमा केले. लीनाचे आॅपरेशन लीलावती हॉस्पिटल मुंबई येथे पार पडले. आॅपरेशननंतर शिक्षकांनी तिच्या घरी जाऊन तिचा अभ्यासक्र म पूर्ण केला. लीनाची आई आणि बहीण श्रावणी तिला दहावीच्या अभ्यासक्र मातील धडे वाचून दाखवत असत. लीनाबरोबरच, तिच्या कुटुंबीयांचे आणि सेंट मेरी शाळा व्यवस्थापनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.